आखाती देश घटवणार क्रुड ऑईलचे उत्पादन

 आखाती देश घटवणार क्रुड ऑईलचे उत्पादन

Declining row of crude oil barrels

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या अर्थव्यवस्थेची चक्रे सातत्याने गतीमान ठेवण्यासाठी सर्वांत आवश्यक घटक म्हणजे कच्चे तेल. भारत कच्च्यातेलाच्या गरजेसाठी पूर्णतः परावलंबी आहे असे म्हणता येईल. कारण आपल्या एकूण गरजेच्या ८५ टक्के कच्चे तेल आपण आयात करतो. त्यातील बहुतांश आखाती देशांमधुन आयात केले जाते. त्यामुळेच आता सौदी अरेबियासह 23 देशांनी तेल उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतल्याने भारतीय अर्थव्यवस्थेसाठी काहीशी चिंतेची स्थिती निर्माण होणार आहे.

सौदी अरेबियासह 23 देश मिळून दररोज 190 दशलक्ष लिटर कच्च्या तेलाचे उत्पादन कमी करणार आहेत. यामुळे तेलाच्या किमती प्रति बॅरल 10 डॉलरपर्यंत वाढू शकतात. याचा थेट परिणाम भारतासह जगभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर होणार आहे. आगामी काळात पेट्रोल-डिझेल महाग होऊ शकते.

सौदी अरेबिया, इराणसह 23 OPEC+ देशांनी तेल उत्पादनात 11.65 लाख बॅरल म्हणजेच सुमारे 19 कोटी लिटर प्रतिदिन उत्पादन कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. एकट्या सौदी अरेबियात गेल्या वर्षीच्या तुलनेत 5% कमी तेलाचे उत्पादन होईल. त्याचप्रमाणे इराकने दररोज सुमारे 2 लाख बॅरल तेलाचे उत्पादन कमी करण्याची तयारी दाखवली आहे. जगातील 50% पेक्षा जास्त कच्च्या तेलाचे उत्पादन OPEC+ देशांमध्ये होते.

या मोठ्या निर्णयाचे कारण स्पष्ट करताना सौदी अरेबियाच्या ऊर्जा मंत्रालयाने म्हटले आहे की, ही कपात ओपेक आणि तेल उत्पादक नॉनओपेक देश संयुक्तपणे करणार आहेत. जगभरातील तेल बाजार मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

कच्च्या तेलाचा जागतिक साठा जगभरात 18 महिन्यांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. अशा स्थितीत जास्त साठा आणि कमी मागणी यामुळे तेलाच्या किमती खाली आल्या आहेत.

भारतावर होणारा परिणाम

एप्रिल ते डिसेंबर 2022 दरम्यान भारताने एकूण 1.27 अब्ज बॅरल तेल खरेदी केले. यातील 19% तेल भारताने रशियाकडून विकत घेतले आहे. या 9 महिन्यांत भारताने तेल आयात करताना सौदी अरेबिया आणि इराकपेक्षा जास्त तेल रशियाकडून खरेदी केले आहे. यामुळे भारताची प्रति बॅरल 2 डॉलर पर्यंत बचत झाली आहे.

तज्ज्ञ नरेंद्र तनेजा म्हणतात की, OPEC+ देशांच्या या निर्णयाचा परिणाम भारतावरही नक्कीच होईल. याचे कारण म्हणजे या गटात रशियाचाही समावेश आहे. तेल उत्पादनात घट झाल्यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमती कधीही वाढतील. अशा परिस्थितीत रशियाकडून सवलतीच्या दरात मिळणाऱ्या तेलाच्या किमतीतही वाढ होणार आहे.

भारत सरकारचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन मानतात की, तेलाच्या एका बॅरलच्या किमतीत 10 डॉलरची वाढ म्हणजे देशाचा GDP वाढ 0.2%-0.3% ने कमी होतो. त्याच वेळी, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसशी संबंधित डॉ. विजय कुमार म्हणतात की, कच्च्या तेलाच्या एका बॅरलच्या किंमतीत 10 डॉलरची वाढ देशाचा महागाई दर 0.1% वाढवते.

SL/KA/SL

5 April 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *