सुप्रिया सुळेनी राखला बारामतीचा गड
बारामती, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पाडल्यामुळे यावर्षीची बारामती लोकसभा मतदार संघाची निवडणूक शरद पवारांसाठी मोठी प्रतिष्ठेची झाली होती. त्यातच अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उभे केल्याने बारामतीकरांसमोर सुनेला निवडून द्यावे की लेकीला असा पेच निर्माण झाला होता. मात्र बारामतीच्या मतदारांनी लेकीला झुकते माप देत मोठ्या मताधिक्याने विजयी केले आहे. सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गट राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा १ लाखांहून अधिक मतांनी पराभव केला आहे.
आज सकाळपासून निवडणुकीच्या कलांमध्ये सुप्रिया सुळे या आघाडीवरच असल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघाच्या या निकालामुळे अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. राज्यातील बारामती लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. या निकालामुळे यावेळीही काकांचा अनुभव आणि चाणक्यनीती यापुढे पुतळ्याला झुकावे लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
या दणदणीत विजयानंतर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, ‘बारामतीमध्ये काही वेगळा लागेल असं मला कधी वाटलं नव्हतं. विशेषत: इथला बारामती हा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे, त्याच्याशी माझं ६० वर्षांचं नातं आहे. माझी सुरुवातच तिथून झाली होती. प्रचार करो न करो, तिथला सामान्य माणूस जो आहे, त्याची मानसिकता मला माहीत आहे. मी तिथं गेलो असू किंवा नसू, तिथले लोक योग्यच निर्णय घेतो आणि घेईल याची मला खात्री होती.
SL/ML/SL
4 June 2024