छाया कदमांनी मराठी भाषेतच गाजवला कान्स

 छाया कदमांनी मराठी भाषेतच गाजवला कान्स

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठमोळी अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) हे नाव सध्या खूपच चर्चेत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित Cannes Film Festival मध्ये छाया कदम यांनी रेड कार्पेटवर हजेरी लावली. नाकात नथ, हटके साडी असा लूक करत त्यांनी आपली संस्कृती सातासमुद्रापार पोहोचवली. छाया कदम यांनी इंग्रजी भाषा बोलता न येण्याचा न्यूनगंड अजिबात न बाळगता कान्स गाजवला. इंग्रजी नाहीतर मराठी भाषेतच कान्समध्ये छाया कदम यांनी संवाद साधला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल सांगितलं आहे.

इंग्रजी भाषा न बोलता आल्याने अनेक मराठी माणसांच्या मनात न्यूनगंड तयार झालेला आपण पाहतो. मात्र छाया कदम या गोष्टीला अपवाद ठरल्या. नुकतेच छाया कदम यांनी its.majja ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी उत्तम इंग्रजी भाषा येत नसल्याचं सांगितलं. छाया कदम म्हणाल्या, ‘मला आधीपासूनच इंग्रजीची भीती होती. पण आता मला असं वाटतं की, मला नाही येत इंग्रजी भाषा बोलता तर ठीक आहे. मला किती छान इंग्रजी बोलता येतं यासाठी नाहीतर माझ्या कामासाठी व माझ्या चित्रपटासाठी इथं बोलावलं आहे. मला माझं काम इथपर्यंत घेऊन आलं आहे’.

Chhaya Kadam hit Cannes only in Marathi language

ML/ML/PGB
4 Jun 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *