देशात भाजपची विजयाची हॅट्रिक, मात्र बहुमत काठावरच

 देशात भाजपची विजयाची हॅट्रिक, मात्र बहुमत काठावरच

नवी दिल्ली, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा 543 जागांचे निकाल आज निवडणूक आयोगाने जाहीर केले. यावेळी भाजपने विजयाची हॅट्रिक केली असली तरीही 400 पारचे नारे देणाऱ्या भाजपला यावेळी काठावरच बहुमत मिळाले आहे. या निवडणूकांमध्ये NDA ने 292 जागा जिंकल्या असून INDIA ने 232 तर अन्य पक्षांनी 19 जागा जिंकल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना म्हणाले “या जनादेशाचे अनेक पैलू आहेत. १९६२ नंतर पहिल्यांदा कोणतं सरकार आपल्या दोन कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर तिसऱ्यांदा वापस आलं आहे. राज्यांमध्ये जिथे विधानसभा निवडणुका झाल्या तिथे एनडीएला भव्य विजय मिळाला आहे”.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशातील जनता आणि भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी नरेंद्र मोदी भावूक झाले. मोदींनी भाषणावेळी आपल्या आईच्या आठवणींना उजाळा दिला. “आजचा हा क्षण माझ्या वैयक्तिक पातळीवर मलादेखील भावूक करणारा क्षण आहे. माझ्या आईच्या निधननंतर ही माझी पहिली निवडणूक होती. पण देशाच्या कोटी-कोटी माता, भगिनींनी आईची कमतरता मला भासू दिली नाही. मी संपूर्ण देशात जिथे-जिथे गेलो तिथे माता, बहिणी, मुलींनी अभूतपूर्व स्नेह आणि आशीर्वाद दिला. ते आकड्यांमध्ये दिसू शकत नाही. देशाच्या इतिहासात महिलांद्वारे वोटिंगचे सर्व रेकॉर्ड तुटले. या प्रेम आणि आपुलकीला मी शब्दांत व्यक्त करु शकत नाही. देशाच्या माता-भगिनींनी मला नवी प्रेरणा दिली आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

SL/ML/SL

4 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *