कणेरी मठात ५४ गायींचा अचानक मृत्यू, ३० गायी गंभीर
कोल्हापूर,दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथील कणरी मठामध्ये ५० हून अधिक गायींचा मृत्यू झाल्याची आणि ३० गायी गंभीररित्या आजारी असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कणेरी मठावर सध्या पंचमहाभूत लोकोत्सव सुरू आहे.मठावर हजारोंच्या संख्येने गायी असून सध्या जनावरांचे प्रदर्शन सुरू असल्यामुळे ही मोठ्या संख्येने जनावरे आणण्यात आली आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या लोकोत्सवाचे उद्घाटन झाले होते. त्यानंतर काल गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद्र गहलोत यांनी मठाला भेट दिली.
दरम्यान याबाबत मठाचे अधिपती काडसिध्देश्वर स्वामी म्हणाले,”कणेरी मठावर घडलेली घटना हा एक दुर्दैवी अपघात आहे. कोणीतरी अज्ञानापोटी हे केलेले आहे. जाणीवपूर्वक कोणी करणार नाही. रस्त्यावरील गाई आणून त्यांचा सांभाळ करणारे आम्ही आहोत .त्यामुळे या गोष्टीचा सगळ्यात मोठं दुःख आम्हाला आहे.”
गाईंचा मृत्यू झाल्याची अधिकृत असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉक्टर पठाण स्पष्ट केले आहे. या जनावरांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची माहिती फॉरेन्सिक कडून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान शिळे अन्न खाल्ल्यामुळे या गायींचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या प्रकरणी वृत्तांकन करायला गेलेल्या खासगी वृत्त वाहिनीच्या वार्ताहराला मठाच्या लोकांनी मारहाण केली आहे, याप्रकरणी पोलिसांनी पत्रकार संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.
SL/KA/SL
24 Feb. 2023