दुष्काळी भागात दाम्पत्याने केली ३५ गुंठ्यात यशस्वी शेती
बीड, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड जिल्हाचं नाव आलं की समोर दुष्काळ अन् शेतकऱ्यांच्या आत्महत्या आठवतात. बहुतांश हे खरं जरी असलं तरी याच जिल्ह्यात अल्पभूधारक काळे शेतकरी दाम्पत्याने पुदिना आणि दुधी भोपळ्याची २५ वर्षांपासून यशस्वी सेंद्रिय शेती केलीय. बीड शहरापासून अगदी पंधरा किलोमीटर अंतरावर Just fifteen kilometers from the city of Beed असलेलं नाळवंडी गावाचं काळे दांपत्य,त्यांच्याकडे अवघी ३५ गुंठेचं जमीन आहे तीही वडिलोपार्जित.Successful farming done by the couple in drought prone areas
रासायनिक शेतीचे होणारे दुष्परिणाम त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी सेंद्रिय शेती करण्याचा चंग बांधला. सुरवातीचे काही काळ उत्पन्न मिळाले नाही. Initially no income was received for some time. त्यांना प्रश्न पडला कमी जागेत काय करावं आणि पत्नी कावेरी यांच्या माहेरहून पुदिनाचे बियाणे घेऊन १९९८ मध्ये सहज शेतात पुदिना लावला. त्या वेळी एक तासाला २५ जुड्याचे शंभर रुपये आले. तेंव्हाच काळे दाम्पत्यांनी शेतामध्ये माेठ्या प्रमाणावर पुदिना पिक घेण्याचे ठरवले.
पीक घेण्यासाठी पाण्याची अत्यंत अवश्यक असल्याने दाेघांनी २० फुट रुंद आणि ९ परस खाेल विहिर खाेदकाम त्याच वर्षी सुरू केले. सहा महिन्यामध्ये विहिर पूर्ण केली. १९९९ मध्ये जाेरदार पाऊस झाल्याने विहिरीला पाणी भरपुर आले. त्यानंतर क्रेन च्या सहाय्याने गाळ काढून घेतला. २००० पासून शेतातील १५ गुंठेमध्ये पुदिना घेण्याचे निश्चीत केले ते आजतागायत तब्बल २२ वर्षे झाली पुदिना पिक घेतात. After 22 years, mint is harvested.
शिल्लक जमिनीत ते आलटून पालटून वेगवेगळा भाजीपाला पीक घेतात यावर्षी त्यांनी दुधी भोपळ्याचे पीक घेतले आहे तर बांधावर कडीपत्ता, नारळाची झाडं लावली आहेत यातून देखील त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे.सध्या त्यांना महिन्याला ४० ते ४५ हजार रुपये यातून मिळतात असे तेच सांगतात.
विशेष म्हणजे सेंद्रिय शेती करत असताना अल्पभूधारक असल्यामुळे त्यांच्याकडे जनावरे नाहीत मात्र ते शेणखत विकत आणून शेती करत असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती केल्यास जमीन चांगली राहते आणि उत्पन्न भरघोस मिळत असल्यामुळे बाकी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करण्याचा सल्ला काळे यांनी दिला आहे.Successful farming done by the couple in drought prone areas
ML/KA/PGB
18 May 2022