जलसंधारण योजनांचा प्रादेशिक अनुशेष दूर करण्यासाठी अभ्यास समिती
मुंबई, दि. 09 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील जलसंधारण योजनांमध्ये प्रादेशिक समतोल राखावा. विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील अनुशेष लक्षात घेऊन पारदर्शक पध्दतीने प्राधान्यक्रम ठरवावा. यासाठी अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे.Study Committee to Clear Regional Backlog of Water Conservation Schemes
महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ संचालक मंडळाची 63 वी बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज दुपारी मंत्रालय, मुंबई येथे झाली. विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी पुढील आणखी निर्देश दिले…
➡️ महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाची कंत्राटदार नोंदणी प्रक्रिया अधिक पारदर्शक व खुली झाली पाहिजे, जेणेकरून नव्या, तरुण कंत्राटदारांनाही संधी मिळेल.
➡️ यापूर्वी मंजूर झालेल्या, प्रगतीपथावर असणाऱ्या कामांचा काटेकोर आढावा घेऊन तातडीने सर्व कामे पूर्ण करण्यात यावी.
ML/KA/PGB
9 Jan. 2023