सार्वत्रिक निवडणुक निकालापूर्वी बाजारात (Stock Market) घसरण

 सार्वत्रिक निवडणुक निकालापूर्वी बाजारात (Stock Market) घसरण

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 31 मे रोजी संपलेल्या अस्थिर आठवड्यात भारतीय बाजाराने मागील आठवड्यातील नफा मिटवला. बाजारात जवळपास 2 टक्के घसरण झाली. एक्झिट पोलचे निकाल, GDP डेटा, मे F&O एक्सपायरी आणि सातत्याने FII ची विक्री,महागाई तसेच जागतिक स्तरावरील व्याजदर दीर्घकाळ चढे राहण्याची शक्यता या गोष्टींचा प्रभाव बाजारावर होताना दिसला. परंतु संमिश्र कॉर्पोरेट अर्निंग्स ,सकारात्मक मान्सून अंदाज आणि DII खरेदीमुळे तोटा मर्यादित होण्यास मदत झाली.

Indian markets erased the previous week’s gains in a volatile week that ended on May 31. The market fell by almost 2 percent. Influencing factors included exit poll results, GDP data, May F&O expiry, sustained FII selling, inflation, and the prospect of global interest rates remaining high for a prolonged period. However, mixed corporate earnings, a positive monsoon forecast, and DII buying helped limit the losses.

निवडणूक निकालाची तारीख जसजशी जवळ येऊ लागली, तसतशी बाजारातील व्यवहारातील अस्थिरता वाढताना दिसली.सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) पुन्हा सरकार स्थापन करेल असा विश्वास बाजाराला वाटत असला तरी जर विजयाचे अंतर कमी झाले तर सरकारला मोठ्या सुधारणा करण्यापासून रोखू शकते अशी भीती गुंतवणूकदारांना वाटली. Investors are worried that a narrow margin of victory may impede the government’s ability to implement major reforms.

एका सर्वेक्षणात असे दिसून आले की पंतप्रधान मोदी यांच्या पक्षाला सार्वत्रिक निवडणुकीत 303 पेक्षा जास्त जागा जिंकणे आवश्यक आहे तरच भारतीय स्टॉक मार्केट मध्ये विक्रमी रॅली दिसेल.

गेल्या काही वर्षातील बाजारातील सर्वात जास्त परतावा हा माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या १० वर्षाच्या कारकिर्दीत आणि नरसिंहराव यांच्या पाच वर्षातील काळात होताना दिसला. The market saw the highest returns during the 10-year tenure of former Prime Minister Dr. Manmohan Singh and the five-year tenure of Narasimha Rao.

India’s GDP grows 7.8 per cent in Q4, FY24 growth . सांख्यिकी मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीत. देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाने (जीडीपी) जानेवारी ते मार्च या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत ७.८ टक्क्यांची वाढ दर्शविली.

गुंतवणूकदारांचे संपूर्ण लक्ष १ जून रोजी जाहीर होणाऱ्या एक्झिट पोलच्या आकड्यावर राहील. ४ जून ला म्हणजेच निवडणूक निकालांच्या दिवशी जर बाजाराला अपेक्षित निकाल नाही लागला तर बाजरात मोठ्या प्रमाणात अस्थिरता वाढेल व बाजार गडगडेल.

जितेश सावंत

( लेखक शेअरबाजार तसेच सायबर कायदा तज्ञ,आहेत )

jiteshsawant33@gmail.com

Stock market falls ahead of general election results

JS/ML/PGB
1 Jun 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *