स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांना पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्र जीवन गौरव पुरस्कार

 स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांना पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्र जीवन गौरव पुरस्कार

नाशिक, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :नदी संस्कृतीचे जतन आणि राष्ट्र कार्यात लोकसहभाग वाढविण्यासाठी गोदावरी उपक्रम हाती घेणाऱ्या नाशिक येथील रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचा पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन पुरस्कार आयोध्येतील रामजन्मभूमी नासाचे विश्वस्त परमपूज्य स्वामी गोविंद गिरीजी महाराज यांना प्रदान करण्यात आला.

नाशिक येथे गोदाकाठी झालेल्या सोहळ्यामध्ये आचार्य जितेंद्रनाथ महाराज इस्कॉन चे गौरांग प्रभू महाराज यांच्या हस्ते गोविंद गिरीजी महाराज यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, महावस्त्र, श्रीराम प्रतिमा आणि दोन लाख 51 हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त झालेल्या या कार्यक्रमाला अहिल्यादेवींचे वंशज स्वप्निल राजे होळकर, भक्ती चरणदास जी महाराज, अनेक संत महंत आणि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन करताना इस्कॉनचे गौरांग प्रभू महाराज म्हणाले की मनाची दुर्बलता दूर करण्यासाठी समाज संस्कारीत करण्यासाठी साधुसंतांचे कार्य महत्त्वाचे आहे . यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना गोविंदगिरी जी महाराज म्हणाले की भारतामध्ये विविधता असली तरी समरसता आहे, ही समरसता टिकविणे आपली सर्वांची जबाबदारी आहे. संस्कृतीमध्ये विविधता असली तरी हिंदुत्व आपला प्राण आहे. भारताचा इतिहास हा पराभवाचा इतिहास नाही तर संघर्षाचा इतिहास आहे. देश कार्यासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा आपण श्रीरामचरित्रातून, छत्रपती शिवाजी महाराज तसेच अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यातून घेतली पाहिजे सर्व प्रकारच्या भेदभावना मूठ माती देऊन सामर्थ्यवान देश निर्माण करणे आपले कर्तव्य आहे.

त्यासाठी संतांच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन होत राहील. महाराष्ट्र देशाचा आधार आहे, देश सामर्थ्यवान असेल तर कोणीही आपल्यावर आक्रमण करू शकणार नाही. आयोध्या सिर्फ झाकी है काशी, मथुरा तो हमारी है लेकिन पीओके अभी बाकी है असे सांगून ते म्हणाले की देशात विविधता जपणे चुकीचे नाही पण राष्ट्र प्रथम ही भावना सतत जागृत राहिली पाहिजे असे गोविंदगिरी जी महाराज म्हणाले. अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीचे हे वर्ष रामतीर्थ गोदावरी सेवा समितीद्वारे विविध उपक्रमाद्वारे साजरे करण्यात येणार असल्याचेही गोविंदगिरी जी महाराज यांनी समितीच्या वतीने जाहीर केले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक समितीचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी केले. आयोध्या येथील राम मंदिरातील राममूर्तीच्या नाशिक येथील वेदमूर्ती शांताराम शास्त्री भानोसे यांनी यावेळी उपस्थित त्यांना आशीर्वाद पर मार्गदर्शन केले. First Ramtirtha Goda Rashtra Jeevan Gaurav Award to Swami Gobind Devgiriji Maharaj

ML/ML/PGB
1 Jun 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *