स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामात राज्याचा हस्तक्षेप बेकायदेशीर

 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामात राज्याचा हस्तक्षेप बेकायदेशीर

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील सर्व नगरपरिषद , नगरपंचायत आणि महापालिकांच्या कारभारात राज्य सरकार हस्तक्षेप करत आहे , त्यांच्या माथी अनावश्यक योजना मारत असून त्यात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केला .State interference in the work of local bodies illegal

राज्यातील महानगरांतील समस्या , प्रभाग रचना फेर रचना , तेथील विकासकामे आदी विषयांवरील नियम २९३ अन्वये विरोधी सदस्यांनी उपस्थित केलेल्या चर्चेची सुरुवात करताना ते बोलत होते.

या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मूलभूत कामं सोडून जाहिरात आणि सुशोभीकरण या कामांमध्ये मोठा खर्च केला जातो आहे, त्यात सत्तारूढ पक्षाच्या लोकांनाच प्राधान्य दिलं जातं आहे, एकट्या मुंबईत सात हजार कोटींहून अधिक खर्च केला जातोय असं पवार म्हणाले.

मेट्रो प्रकल्पातील घर वाटपात एक हजार कोटींचा घोटाळा झाला असून १३५ घरे बनावट पद्धतीने तयार करण्यात आली आहेत, राज्य निर्मितीपासून जितका खर्च झाला त्यापेक्षा जास्त खर्च आता जाहिरातींवर केला जातो आहे अशी टीका ही त्यांनी केली.

ठाण्यातील मनोरुग्णलयाची जागा आणि मुंबईतील महालक्ष्मी रेस कोर्स इतरत्र हल्विण्यामागे काही बिल्डरांचा फायदा होणार असल्याची चर्चा आहे, पुण्यातील महापालिका कारभार गलथान झाला आहे, तिथले लोक त्यावर मोठ्या प्रमाणावर नाराज आहेत असं पवार म्हणाले.

ML/KA/PGB
17 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *