कांदा निर्यातीवरचे वाढीव शुल्क कमी करण्यासाठी राज्य सरकारचा पुढाकार

बीड, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने कांदा निर्यातीच्या शुल्कात 40 टक्के वाढ केल्यामुळे हा शेतकऱ्यांवर अन्याय असून हे वाढ कमी करण्यासाठी आपण दिल्ली येथे कृषिमंत्री आणि पियुष गोयल यांची भेट घेणार असल्याचे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे पत्रकारांशी बोलत होते.
राज्यात काही भागात ओला तर काही भागात कोरडा दुष्काळ आहे. केंद्र सरकारने निर्यातीवर 40% टक्के वाढ करण्याचा निर्णय शेतकरी आणि कांदा उत्पादक यांच्यासाठी अन्यायकारक आहे. या संदर्भात आपण केन्द्रिय् कृषी मंत्र्यांशी बोललो असून उद्याच यासाठी दिल्लीला जाणार आहोत. हे निर्यात शुल्क कमी करण्याची मागणी करणार आहे. तसेच राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांच्या बाजूने असून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी भाव पडणार याची आम्ही काळजी घेणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी आणि बाजार समित्यांनी आंदोलन न करता मार्ग काढण्याचे आवाहन त्यांनी केले.
ML/KA/SL
21 Aug 2023