भारतात लवकरच मिळणार Starlink Internet Service

मुंबई, दि. 6 : एलन मस्क यांच्या कंपनी स्पेसएक्सला भारतात स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट सेवा चालवण्यासाठी दूरसंचार विभागाकडून मंजुरी मिळाली आहे. आता त्यांना फक्त इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर म्हणजेच IN-SPACE कडून मंजुरी मिळण्याची वाट पाहावी लागत आहे. रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा चालवण्याचा परवाना मिळवणारी स्टारलिंक ही तिसरी कंपनी आहे. यापूर्वी, युटेलसॅटच्या वनवेब आणि रिलायन्स जिओला देशांतर्गत त्यांच्या सेवा पुरवण्यास मान्यता देण्यात आली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्टारलिंक भारतात ८४० रुपयांमध्ये एका महिन्यासाठी अमर्यादित डेटा प्रदान करेल.
द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, स्पेसएक्स भारतात त्यांच्या स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करेल, ज्याची किंमत दरमहा $१० पेक्षा कमी किंवा अंदाजे ८४० रुपये आहे.
स्टारलिंकसह उपग्रह संप्रेषण कंपन्यांचे लक्ष्य त्यांच्या वापरकर्त्यांची संख्या वेगाने वाढवणे आहे. मध्यम ते दीर्घकालीन कालावधीत ते १ कोटी ग्राहकांपर्यंत पोहोचू शकते. यामुळे कंपन्यांना स्पेक्ट्रमचा प्रचंड खर्च भरून काढण्यास मदत होईल.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) उपग्रह संप्रेषण कंपन्यांना शहरी वापरकर्त्यांसाठी मासिक शुल्क ₹ 500 ठेवण्याची शिफारस केली आहे. यामुळे उपग्रह संप्रेषण स्पेक्ट्रम पारंपारिक स्थलीय सेवांपेक्षा महाग होतो.
अहवालांनुसार, तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की प्रीमियम किंमतीमुळे, स्टारलिंकसारख्या आर्थिकदृष्ट्या मजबूत कंपन्यांना भारताच्या शहरी बाजारपेठेतील इतर कंपन्यांशी स्पर्धा करण्यास कोणतीही अडचण येणार नाही.