एसटीचे सेवानिवृत्त कर्मचारी पेंशन पासून वंचित
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त होऊन ४ वर्षे झालीत. अद्याप ही सेवानिवृत्त चार हजार कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळालेली नाही. पेंशन योजनेपासून ते वंचीत आहेत. त्यामुळे येत्या 9 सप्टेंबर रोजी मुंबईतील 300 कर्मचारी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांची मुक भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विनंती करणार आहे. जर प्रश्न सुटला नाही तर 13 तारखेला सांगलीत होणाऱ्या बैठकीत या बाबत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस स.य. विचारे यांनी दिली.General Secretary of Maharashtra State Transport Retired Employees Association
मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते . ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सेवेतून निवृत्त होऊन ३ ते ४ किंवा त्यापेक्षा अधिक वर्षे झालेल्या महामंडळाच्या सर्व स्तरातील अधिकारी, कर्मचारी, चालक, वाहक व यांत्रिक यांना ईपीएस ९५ अंतर्गत मिळणारे निवृत्ती वेतन सुरु होत नाही. केवळ तांत्रिक बाबी आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि भविष्य निर्वाह निधि कार्यालय यांच्या समन्वयाने सुटू न शकणाऱ्या या प्रश्नाकडे केन्द्र आणि राज्य सरकार दोघेही लक्ष देत नाहीत.ST retired employees deprived of pension
वयोमानापरत्वे आमच्यातील अनेकांना भविष्य निर्वाह निधि कार्यालय आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उंबरठे झिजविणे शक्य होत नसले तरी आम्ही मोठ्या आशेने आज ना उध्या काम होईल, या न्यायाच्या आशेत हे उंबरठे झिजवतो आहोत. आमच्या या प्रलंबित मागणीसाठी, एस. टी. महामंडळाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या बुधवार ९ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटने 300 कर्मचारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांची भेट घेणार आहोत. त्यांच्या कडे लोकशाही मार्गाने आम्ही आमच्या मागण्या पत्राव्दारे मांडणार आहोत, असे विचारे यांनी सांगितले.
ML/KA/PGB
7 Nov .2022