मुंबईत ‘विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.०’ लसीकरण मोहीम

 मुंबईत ‘विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.०’ लसीकरण मोहीम

मुंबईत ‘विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.०’ लसीकरण मोहीम

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने “विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.० या लसीकरण मोहीमेची पहिली फेरी १०० टक्के यशस्वी केली आहे. शहरात ७ ते १२ ऑगस्ट या कालावधीमध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण मुंबईत घरोघरी जाऊन लसीकरण मोहीम राबवली. या मोहिमेची दुसरी फेरी दिनांक ११ ते १६ सप्टेंबर दरम्यान राबवण्यात येणार आहे.

पहिल्या फेरीसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून ० ते ५ वयोगटातील २,६३८ मुलांचे व ३०४ गरोदर मातांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. पैकी २,८०६ बालकांचे व २९६ गरोदर मातांचे लसीकरण करण्यात आले आहे. म्हणजेच पहिल्या फेरीचे उदिष्ट १०० टक्के साध्य झाले आहे. या मोहीमेत अंगणवाडी सेविकांचा तसेच इंडियन असोसिएशन ऑफ पेडियाट्रिशिअनचा सहभाग होता.

याच कालावधीत नियमित लसीकरणाचा विचार करता एकूण १,४०६ लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आली. त्यामध्ये ० ते ५ वयोगटातील ११,५३९ बालकांचे व १,२०० गरोदर मातांचे नियमित लसीकरण करण्यात आले आहे. ‘Special Mission Rainbow 5.0’ vaccination campaign in Mumbai

ML/KA/PGB
15 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *