रावणाच्या लंकेत उभे राहणार सीतेचे मंदिर

 रावणाच्या लंकेत उभे राहणार सीतेचे मंदिर

कोलंबो, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रभू श्रीरामांचा शतकांचा वनवास संपून त्यांचे भव्य मंदिर अयोध्या नगरीत उभारल्यामुळे रामभक्त भारतीयांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. दररोज हजारोंच्या संख्येने रामभक्त अयोध्येतील राममंदिराला भेट देत आहेत. त्यानंतर आता रावणाच्या श्रीलंकेत माता सीतेचे भव्य मंदिर उभारण्यात येत आहे. सीता मातेच्या अभिषेकासाठी अयोध्येच्या शरयू नदीचे पवित्र जल श्रीलंकेला पाठवण्यात येणार आहे. भारत सरकारने त्याची प्रक्रिया सुरू केली आहे. श्रीलंकेतील ‘सीता अम्मा मंदिर’ अभिषेक सोहळा 19 मे रोजी होणार आहे. या कार्यक्रमात अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. सीता अम्मा मंदिर श्रीलंकेतील नुवारा एलियाच्या डोंगरावर आहे. ज्याचा रामायणात उल्लेख आहे, ती हीच अशोक वाटिका आहे, असे मानले जाते.

उत्तर प्रदेश सरकारन शरयू नदीचे पाणी श्रीलंकेत नेण्यासाठी परवानगी दिली आहे. 15 मे रोजी श्रीलंका सीता माता मंदिर प्रशासनाचं एक पथक शरयू नदीतून जल नेण्यासाठी भारतात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. रावणाने सीता मातेला अशोक वाटिकेत कैद केले होते, तिथेच माता सीतेचे मंदिर बांधले जात आहे. या सोहळ्याला श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे आणि पंतप्रधान दिनेश गुणवर्धने उपस्थित राहणार आहेत.

माता सीतेला रावणाने अशोक वाटिकेतच कैद केले होते. जेव्हा हनुमान माता सीतेचा शोध घेत होते तेव्हा ते प्रथम येथे पोहोचले. हनुमानजींचे पुरावे देखील सीता अम्मा मंदिराजवळ आहेत. त्यांच्या पावलांचे ठसे येथे आहेत. याच ठिकाणी सीता मातेचं मंदिर उभारण्यात आलं आहे.

श्रीलंकेच्या प्रतिनिधी मंडळाने शरयू नदीच्या पाण्यासाठी भारत सरकारला अधिकृत विनंती केली आहे. शरयूचे पाणी श्रीलंकेला पाठवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारला व्यवस्था करायची आहे आणि उत्तर प्रदेश सरकारने काम सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. राम आणि रामाच्या माध्यमातून भारत आणि श्रीलंका यांमधील राजनैतिक संबंध सुदृढ होण्यास यामुळे मदत होणार आहे.

SL/ML/SL

29 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *