शिवराज सिंह चौहान यांचा विक्रम, सर्वांधिक ८ लाखांहून मतांनी विजय
भोपाळ, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि पाच वेळा खासदारपदी राहीलेले शिवराज सिंह चौहान आज सहाव्यांदा लोकसभेवर निवडून आले आहेत. विदिशा मतदारसंघातून चौहान यांनी लोकसभा निवडणुकीत विक्रमी विजय मिळवला आहे. त्यांनी ही निवडणूक 8 लाख 17 हजार 479 मतांनी जिंकली. त्याचबरोबर या विजयाला त्यांनी जनतेचा विजय असे वर्णन केले आहे.
विजयानंतर शिवराज सिंह चौहान म्हणाले, “हा जनतेचा विजय आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आम्हाला हा विजय मिळाला आहे. मी जनतेला सलाम करतो, जनता माझ्यासाठी देव आहे. त्यांनी माझ्यावर इतके प्रेम दाखवले की मी शब्दात व्यक्त करू शकत नाही.
ते पुढे म्हणाले, “पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली, आम्ही विदिशा लोकसभा मतदारसंघाला एक आदर्श संसदीय मतदारसंघ बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू… मध्य प्रदेशातील सर्व 29 जागा भाजप जिंकत आहे आणि NDA सलग तिसऱ्यांदा 300 चा आकडा पार करत आहे. हाच जनतेचा मोदींवर विश्वास दाखवतो.
SL/ML/SL
4 June 2024