राज्यात महाविकास आघाडीने दिली महायुतीला धोबीपछाड

 राज्यात महाविकास आघाडीने दिली महायुतीला धोबीपछाड

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांच्या लढतील महाविकास आघाडीची सरशी झाली आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार राज्यात भाजपने १०, शिवसेना उबाठा गटाने ९, शिवसेना शिंदे गटाने ७, काँग्रेसने १३, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने ७ तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने १ आणि अपक्ष १ अशा जागा जिंकल्या आहेत.

या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्या देशात सर्वसामान्य माणसांनी त्यांची ताकद काय असते हे दाखवून दिलं आहे. सत्ताधारी कितीही मस्तवाल झाले तरी एका बोटाच्या आधारे आपण त्यांना रोखू शकतो. इंडिया आघाडीनं सत्तास्थापनेवर दावा केला पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्या दुपारी जाणार आहे. बाहेरगावी असलेले खासदार उद्या सकाळी येथे येतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले. सकाळी संजय राऊत दिल्लीला जातील मी उद्या दुपारी दिल्ली जाणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

इंडिया आघाडी म्हणून आघाडी आम्ही तयार केली तेव्हा आमच्यापैकी कोणीही पंतप्रधानपदावर दावा केला नव्हता. उद्या सर्वांच्या मतानं इंडिया आघाडीचा नेता ठरवला जाईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. बिहारमध्ये अजूनही मतमोजणी सुरु आहे, काही ठिकाणी छोटे घटकपक्ष आहेत त्यांना संपर्क सुरु आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

चंद्राबाबू नायडू आणि इतरांशी काँग्रेसकडून इतरांकडून संपर्क सुरु आहेत. चंद्राबाबू नायडूंना भाजपनं काही कमी त्रास दिलेला नाही. भाजपच्या त्रासाला कंटाळलेली लोकं इंडिया आघाडीत येतील,असं उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही कोणत्या व्यक्तीच्या विरोधात नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. ज्यादिवशी आमची आघाडी झाली होती त्यावेळी ती संविधान वाचवण्यासाठी झाली होती. देशभक्त आमच्यासोबत येतील. चंद्राबाबू नायडू आमच्यासोबत येतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

छळवणुकीला सर्व लोक कंटाळली आहेत आणि चिडली आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. सुडाच्या राजकारणाला कंटाळलेले देशभक्त एकत्र येतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले. माझी आणि ममता बॅनर्जी यांची चर्चा झाली आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. महाराष्ट्रात 48 जागांवर आमचा विजय व्हावा, अशी अपेक्षा होती, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आम्हाला अजून चार पाच जागांची अपेक्षा होती, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

SL/ML/SL’

4 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *