कमी झालेल्या मतदानाने गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग, परिणामी बाजारात घसरण.

 कमी झालेल्या मतदानाने गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग, परिणामी बाजारात घसरण.

मुंबई, दि. 5 (जितेश सावंत) : पहिल्या दोन चरणांमध्ये झालेले मतदान गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण करू न शकल्याने बाजारात घसरण झाल्याची पाहायला मिळाली. The market fell as lower polls in the first two phases did not meet investor expectations.

नवीन आर्थिक वर्ष 2024-25 (FY25) च्या पहिल्या महिन्यात भारतीय शेअर बाजार अस्थिरतेसह बंद झाले.विक्रमी उच्चांक पाहिल्यानंतर बाजाराने अनपेक्षित घसरण देखील अनुभवली. निवडणूकपूर्व रॅली सुरू होऊनही अस्थिरता परत आली.

मागील आठवड्यातील बाजारातील वाढीला,या आठवड्यातील पहिल्या सत्रापासून सुरुवात झाली.
जागतिक बाजारातील सकारात्मक संदेश तसेच खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकिंग शेअर्स पीएसयू शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाल्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने उसळी घेतली. बाजारातील नेत्रदीपक वाढीमुळे बाजाराच्या मार्केट कॅपने पुन्हा एकदा नवा ऐतिहासिक उच्चांक गाठला.

The US Federal Reserve has announced that there will be no change in interest rates.
या आठवड्यात निफ्टीने नवा विक्रमी उच्चांक गाठला परंतु नफावसुलीमुळे तो टिकवण्यात बाजाराला यश आले नाही. बाजारचे लक्ष अमेरिकन फेडच्या घोषणेकडे होते. बुधवारी यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कोणताही बदल न करण्याची घोषणा केली तसेच त्यांनी असेही सूचित केले की त्यांचा कल अजूनही दर कमी करण्याकडे आहे. परंतु महागाईच्या आकडेवारीत अलीकडेच वाढ झाल्यामुळे दर कपातीची योजना कोलमडली आहे.

GST collection hits record high of Rs 2.10 lakh crore in April
या आठवड्यात जाहीर झालेल्या देशात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनात विक्रमी वाढ झाली सरकारने एप्रिल 2024 मध्ये जीएसटीमधून विक्रमी 2.10 लाख कोटी रुपये जमा केले आतापर्यंत कोणत्याही महिन्यात जमा झालेला हा सर्वाधिक जीएसटी ठरला. या सगळ्याच्या बाजारावर चांगला परिणाम झाला व बाजार वधारला.

शेवटच्या दिवशी बाजार जोरदार कोसळला वरच्या
स्तरावर झालेली विक्री, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँक सारख्या मोठ्या समभागांमध्ये झालेली विक्री, संध्याकाळी जाहीर होणारा अमेरिकन Nonfarm payroll data तसेच लोकसभा निवडणुकांच्या निकाला अगोदर गुंतवणूकदारांच्या मनात निर्माण झालेली भीती. पहिल्या दोन चरणांमध्ये कमी झालेले मतदान बाजाराला अपेक्षित असलेल्या अनुमानपेक्षा वेगळे ठरल्याने गुंतवणूकदारानी आपल्या पद्धतीने त्याचे केलेले विश्लेषण आणि विदेशी गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणात झालेली विक्री या सगळ्याच्या परिणाम बाजारावर झाल्याने बाजार गडगडला.
The market experienced a significant decline on the last day of trading.
This decline was caused by a sell-off at the top-end of the market and a sell-off in major stocks such as Reliance Industries and HDFC Bank. Additionally, investors were feeling anxious ahead of the Lok Sabha election results and the upcoming US non-farm payroll data release. The low turnout in the first two stages of the election was unexpected and was likely influenced by investors’ own analysis, as well as the massive selling by foreign investors. As a result of these factors, the market experienced a significant drop.

शुक्रवारी अमेरिकन मार्केट मोठी उसळी घेऊन बंद झाले. एप्रिलच्या नोकऱ्यांच्या अहवाल/ जॉब डेटामुळे फेडच्या दर कपातीची आशा वाढल्याने डाऊ 400 हून अधिक अंकांनी बंद झाला. Dow closes higher by more than 400 points as April jobs report bolsters Fed rate cut hopes

येणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष आर्थिक वर्ष 2023-24 (Q4FY24) चे जानेवारी-मार्च तिमाही निकाल, देशांतर्गत आणि जागतिक आर्थिक डेटा, कच्च्या तेलाच्या किमती आणि जागतिक संकेतांवर लक्ष असेल.
Technical view on nifty-शुक्रवारी निफ्टीने 22475.8 चा बंद भाव दिला.निफ्टी साठी 22440-22420-22389-22368-22349-22305 हे महत्वाचे सपोर्ट(Support)
आहेत हे तोडल्यास निफ्टी 22290-22240-22212-22183-22126-22096.8-22040-20023-21962-21926-21812-21797-21740.80-21697-21640-21598-21576.05-21547-21517-21500 हे स्तर गाठेल.

वरच्या स्तरावर निफ्टीसाठी
22517-22536-22600-22687-22719-22730-22800-22859-22986-23177 हे रेसिस्टन्स (Resistance) ठरतील.

(लेखक शेअरबाजार तसेच सायबर कायदा तज्ञ,आहेत)

jiteshsawant33@gmail.com

ML/ML/PGB 5 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *