विदर्भातील आत्महत्यांसाठी शरद पवार यांनी माफी मागावी

 विदर्भातील आत्महत्यांसाठी शरद पवार यांनी माफी मागावी

अमरावती, दि.२४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीर मधील 370 कलम हटवले या देशातून आतंकवाद समाप्त करून काश्मीरला नेहमीसाठी भारताचे बनविण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले आहे असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. आज अमरावती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या जाहीर सभेत अमित शहा बोलत होते.

सत्तर वर्षापासून कॉंग्रेसच्या सरकारने अयोध्येतील प्रभू राम मंदिराचे काम सरकारने पूर्ण केले नाही ते नरेंद्र मोदी यांनी करून दाखविले. विरोधी पार्टीच्या सोनिया गांधी,शरद पवार,उद्धव ठाकरे यांना प्रभू राममंदिर प्राणप्रतिष्ठापना साठी निमंत्रित केले तरी ते उपस्थित राहिले नाहीत त्यांनी प्रभू रामाचा अपमान केला असा आरोप अमित शहा यांनी केला.
पुढे शहा म्हणाले की शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होते,देशाचे कृषिमंत्री असतांना त्यांनी विदर्भातील सिंचनासाठी काहीच केले नाही. विदर्भातील हजारो शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या शरद पवार यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नींची माफी मागितली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

ML/ML/SL

24 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *