Byju’s कडून सहा महिन्यांत दुसऱ्यांदा मोठी कर्मचारी कपात

 Byju’s कडून सहा महिन्यांत दुसऱ्यांदा मोठी कर्मचारी कपात

मुंबई,दि.3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Edu-tech क्षेत्रातील मोठी नाव असलेल्या Byju’s या अल्पावधित नावारुपाला आलेल्या कंपनीने आता मार्केट डाऊन असल्याचे कारण देत कर्मचारी कपात करण्याचा सपाटाच लावला आहे.

 BYJU’s ने 1,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. विशेष म्हणजे Online meeting मधुन कंपनीने कर्मचाऱ्यांना हा निर्णय कळवला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंजिनीअरिंग टीममधील 15 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. या कंपनीने यापूर्वी टेक आणि इंजिनिअरिंग टीममधील 30 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते.

ऑक्टोबरमध्ये, कंपनीने सांगितले होते की त्यांनी आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 5 टक्के म्हणजे 50,000 कर्मचाऱ्यांपैकी एकूण 2,500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. त्यानंतर कंपनीचे संस्थापक बायजू रवींद्रन कर्मचारी कपातीचे समर्थन केले होते आणि कंपनीच्या फायद्यासाठी  उचललेले हे आवश्यक पाऊल असल्याचे सांगितले होते.

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *