संत खंडोजी महाराज पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ

 संत खंडोजी महाराज पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ

नंदुरबार, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : १९८ वर्षाची परंपरा असलेली संत खंडोजी महाराज संस्थानची दिंडी नंदुरबारहुन पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. संत खंडोजी महाराज संस्थानची पायी दिंडी नित्य नेमाने नंदुरबारहून पंढरपुरला जात असते. कुकरमुंडा येथून या पारंपारिक दिंडीला सुरुवात झाली असून जिल्ह्याभरात ठिकठिकाणी दिंडीचे स्वागत करण्यात आले. उद्धव महाराज हे गेल्या ४० वर्षांपासून पंढरपुराची पायी वारी करत आहेत. पंढरपूर पोहोचण्यासाठी या दिंडीला २५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. ही दिंडी नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर हे ४ जिल्हे पार करत सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे…. Sant Khandoji Maharaj Palkhi en route to Pandharpur

ML/ML/PGB
23 Jun 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *