गटातटात विखुरलेल्या आंबेडकरी नेत्यांच्या ऐक्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरू

 गटातटात विखुरलेल्या आंबेडकरी नेत्यांच्या ऐक्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरू

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या राष्ट्रीय पक्षाची सध्या वाताहत झाली आहे .तो पक्ष गटातटात विखुरला गेला आहे.पक्षाची अनेक शकले पडली आहेत.याच संधीचा फायदा घेऊन आंबेडकरी समाजातील समूहांवर अन्याय अत्याचार होत आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत समाजाला एकसंघ ठेवण्यासाठी गटातटात विखुरलेल्या आंबेडकरी नेत्यांचे ऐक्य व्हावे यासाठी भंडारा – नागपूर येथील आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या सर्व नेत्यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.जर हे आंबेडकरी नेते एकत्र आले नाही तर त्यांच्या घरासमोर बसून आंदोलन करण्याचा इशारा भंडारा येथील सामाजिक कार्यकर्ते व रिपब्लिकन एकीकृत समिती महाराष्ट्र प्रमुख चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी दिला आहे.
रिपब्लिकन एकीकृत समिती महाराष्ट्रच्या वतीने शनिवारी १७ आगस्ट रोजी दादरच्या नायगाव येथे सर्व रिपब्लिकन गटांना एकत्र आणण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीला बीआरएसपी चे अध्यक्ष सुरेश माने, रिपब्लिकन पक्षाचे राजरत्न आंबेडकर, खा. चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद पक्ष , रा. सु.गवई गटाचे महाराष्ट्र अध्यक्ष लोंढे, खोरीपा व आनंद राज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना अशा सहा पक्षाचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत आंबेडकरी गटाततटात विखुरलेल्या सर्व प्रभावशाली नेत्यांना एकत्र आणून आघाडीत सहभागी करण्याचा चंग बांधण्यात आला.आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व गटांच्या नेत्यांना निळ्या झेंड्याखाली एकत्र आणून समाजाला नवी दिशा देण्याचे काम करू असे चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी सांगितले.
वंचीत बहुजन आघाडी चे अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे प्रा.जोगेंद्र कवाडे,या प्रमुख नेत्यांसोबत लवकरच चर्चा करण्याचा आम्ही प्रयत्न करू असा सकारात्मक निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
जे गट रिपब्लिकन एकीकृत समिती किंवा
ऐक्यवादी आघाडीत सामील होणार नाहीत, अशांना आंबेडकरी जनता कदापि माफ करणार नाही.त्यांना त्यांची जागा आगामी विधानसभा निवडणुकीत दाखवल्याखेरीज राहणार नाही असा इशारा ही चंद्रशेखर टेंभुर्णे
यांनी दिला.
चंद्रशेखर टेंभुर्णे यांच्यासह भंडारा व नागपूर येथील सामाजिक कार्यकर्ते अमृत बनसोड,
असित बागडे,रोशन जांभुळकर,दिलीप वानखेडे,रमेश जांगडे,एस के गजभिये,महिला प्रतिनिधी रेश्मा भोयर ,डॉ.सुरेश खोब्रागडे,
राजेश मडाम,आदी सामाजिक कार्यकर्ते यासाठी झटत आहेत.
रिपब्लिकन गटाच्या नावावरील गवई गट, आठवले गट, कवाडे गट, राजाभाऊ खोब्रागडे यांचा खोरीपा गट, राजाराम खरात यांचा आर के गट ,सुलेखा कुंभारे गट आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडी,असे छोटं मोठे 48 आंबेडकर गट कार्यरत आहेत. या सर्वांना एका व्यासपीठावर आणणे अशक्य असलं तरी तसे मोठ बांधण्याचे प्रयत्न सुरू आहे.असे जरी सांगितले जात असले तरी ही नेते मंडळी नेमकी राजकीय भुमिका काय घेतात ? यावर या रिपब्लिकन एकीकृत समितीचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

SW/ML/PGB
19 Aug 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *