गगनबावडा तालुक्यात सांबराचा बुडून मृत्यू
कोल्हापूर, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नुकतीच गगनबावडा तालुक्यात सांबराची शिकार झाल्याची घटना घडली होती.आता कुत्र्याच्या हल्यात सांबराचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गगनबावडा या ठिकाणी मोकाट कुत्र्यांनी सांबराचा पाठलाग केल्यानं या सांबराने गावातील एका तलावात उडी मारली. त्यामुळे या तलावाच्या पाण्यात बुडून या सांबराचा मृत्यू झाला.
गगनबावडयाचे उपसरपंच मुस्ताक वडगावे यांच्यासह स्थानिक नागरिक त्याचबरोबर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या सांबराला तलावातून बाहेर काढलं.त्याला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले.मात्र पाण्यात बुडून या सांबराचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्या सांबराचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. आठवड्याभरात दोन सांबरांचा मृत्यू झाल्यानं तालुक्यांतील वन्य प्राण्यांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.
ML/ML/SL
19 August 2024