पुण्यातील रिक्षाचालकांचे महिलांना राखीपौर्णिमेनिमित्त गिफ्ट, भाड्यात १०० रूपयाची सूट
रक्षाबंधन निमित्त सोमवारी १९ ऑगस्टला सकाळी ८ ते रात्री ८ यावेळेत पुणे स्टेशन येथील रिक्षा मित्र प्रीपेड बूथ वरून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना १०० रुपये पर्यंतचा रिक्षा प्रवास मोफत दिला जात असून त्यापुढे भाडे झाल्यास एकूण भाड्यातून रू. १०० ची सूट देण्यात येणार आली आहे. शहरातील आतापर्यत ८०० रिक्षा पुणे स्टेशन वरील रिक्षा मित्र प्रीपेड बूथवर नोंदणी केली आहे. या सर्व रिक्षातून महिलांना फायदा मिळणार आहे.