किरकोळ विक्री क्षेत्रात मजबूत सुधारणा

 किरकोळ विक्री क्षेत्रात मजबूत सुधारणा

नवी दिल्ली, दि.18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जुलैमध्ये देशभरात किरकोळ विक्रीत (Retail sector) सुधारणा झाली असल्याची माहिती रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (RAI) दिली आहे. ती आता जुलै, 2019 च्या तुलनेत सुमारे 72 टक्क्यांच्या आसपास पोहोचली आहे. किरकोळ विक्रेत्यांच्या संघटनेच्या मते, साथीच्या आधीच्या कालावधीच्या तुलनेत जून 2021 मध्ये किरकोळ विक्रीत सुमारे 50 टक्के सुधारणा होती. रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार, जुलै 2019 च्या तुलनेत दक्षिण भारतात किरकोळ व्यवसायातील विक्रीची पातळी जुलै 2021 मध्ये 82 टक्क्यांवर पोहोचली आहे. जून 2021 मध्ये हा आकडा 50 टक्के होता.

पश्चिम भारतात किरकोळ विक्रीत अद्याप सुधारणा होणे बाकी
Retail sector in West India are yet to improve

मात्र पश्चिम भारतामध्ये यासंदर्भात थोडी सुधारणा होणे बाकी आहे. पश्चिम भारतात, जुलै, 2019 च्या तुलनेत जुलै, 2021 मध्ये विक्रीत (Retail sector) 57 टक्क्यांपर्यंत सुधारणा पहायला मिळाली आहे. रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (RAI) म्हटले आहे की महाराष्ट्रात दीर्घकाळ असलेले निर्बंध हे त्याचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे राज्यातील किरकोळ विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. श्रेणीनुसार, जलद सेवा रेस्टॉरंट्समध्ये जुलैमध्ये सर्वात जास्त सुधारणा दिसून आली. जुलै 2021 मध्ये, साथीच्या आधीच्या तुलनेत विक्री 97 टक्के होती. मात्र जुलै 2021 मध्ये, सलूनसह ब्युटी पार्लर आणि वेलनेस साथीच्या आधीच्या कालावधीच्या तुलनेत 50 टक्के आणि कपड्यांची विक्री 63 टक्क्यांवर होती.

किरकोळ विक्री क्षेत्रावरील निर्बंध हटवल्यामुळे सुधारणा होण्यास वाव
The removal of restrictions on the retail sector could lead to improvements

या आकडेवारीसंदर्भात, रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (RAI) मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार राजागोपालन यांनी सांगितले की, सणासुदीचा काळ जवळ येत असताना, आधुनिक किरकोळ क्षेत्रावरील (Retail sector) देशभरातील निर्बंध हटवण्यात आल्यामुळे, येत्या काळात विक्रीत लक्षणीय सुधारणा होण्यास वाव असल्याचे दिसत आहे. यामुळे सामान्य स्थिती आणि सुरळीत कामकाज पुनर्स्थापित होण्याची अपेक्षा आहे. रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाने म्हटले आहे की किरकोळ क्षेत्र सुरू झाल्यामुळे सुधार होण्याची अपेक्षा आहे. संघटनेने म्हटले आहे की कोट्यवधी लोकांचा उदरनिर्वाह किरकोळ क्षेत्रावर अवलंबून आहे.
According to the Retailers Association of India (RAI), the retail sector has improved across the country in July. It has now reached around 72 per cent as compared to July, 2019. According to the Association of Retailers, there was a nearly 50 percent improvement in retail sales in June 2021 compared to the previous period of the pandemic.
PL/KA/PL/18 AUG 2021

mmc

Related post