दुसर्‍या महायुद्धानंतरच्या सर्वात वाईट मंदीनंतर सुधारणांचा काळ सुरु : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

 दुसर्‍या महायुद्धानंतरच्या सर्वात वाईट मंदीनंतर सुधारणांचा काळ सुरु : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

नवी दिल्ली, दि.8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (International Monetary Fund) या वर्षाच्या जागतिक विकासाचा दर (Growth Rate) सहा टक्के रहाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. नाणेनिधीचे व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टीन जॉर्जिवा यांनी म्हटले आहे की दुसर्‍या महायुद्धानंतरच्या (second world war) सर्वात वाईट जागतिक मंदीनंतर (global recession) सध्या सुधारणांचा काळ आहे. अलिकडेच सुरु झालेले कोरोना लसीकरण आणि अमेरिकेत चांगल्या धोरणांच्या समर्थनामुळे हे शक्य झाले आहे. जॉर्जिवा म्हणाले की, मागील एक वर्षात झालेल्या विलक्षण आणि समन्वित कार्यवाहीमुळे हे शक्य झाले आहे.

कमकुवत आणि गरीब देश मागे पडत आहेत
Weak and poor countries are lagging behind

ते म्हणाले की, दुसर्‍या महायुद्धानंतरच्या (second world war) सर्वात वाईट जागतिक मंदीनंतर (global recession) सुधारणा होत आहेत. त्यासाठी आम्ही आमच्या जागतिक वाढीचा अंदाज 6 टक्क्यांपर्यंत वाढविला होता असे जॉर्जिवा म्हणाले. बुधवारी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund) आणि जागतिक बँकेच्या (world bank) वार्षिक बैठकीत जॉर्जिवा यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की अमेरिका आणि चीन यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात प्रगत व विकसनशील अर्थव्यवस्था प्रगती करीत आहेत. या वेगवान सुधारणांमध्ये कमकुवत आणि गरीब देश मागे पडत आहेत.

टाळेबंदीमुळे मागणीवर परिणाम
Lockout affects demand

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेवर (corona second wave) नियंत्रण मिळवण्यासाठी देशातील अनेक राज्यांत स्थानिक पातळीवर टाळेबंदी (Lockdown) सुरु झाली आहे. परंतु भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर डॉ. शक्तीकांत दास यांनी स्पष्टपणे बजावले आहे की स्थानिक पातळीवर लावण्यात येत असलेल्या टाळेबंदीमुळे मागणीवर विपरित परिणाम होईल.
 
The International Monetary Fund (IMF) has projected a growth rate of six per cent this year. Christine Georgieva, managing director of the International Monetary Fund, said the worst recession since World War II was the time of reform. This has been made possible by the recently launched corona vaccination and support for better policies in the United States.
PL/KA/PL/8 APR 2021
 

mmc

Related post