किरकोळ महागाई सहा महिन्यातील सर्वोच्च पातळीवर

 किरकोळ महागाई सहा महिन्यातील सर्वोच्च पातळीवर

मुंबई, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पेट्रोल, डिझेल आणि खाद्यपदार्थांच्या महागाईमुळे देशातील किरकोळ महागाई (Retail Inflation) 6 महिन्यातील सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) वर आधारित किरकोळ महागाई दर मे महिन्यात 6.3 टक्के होती. एप्रिलमध्ये ती 4.23 टक्के होती.

किरकोळ महागाई रिझर्व्ह बँकेच्या मर्यादेच्या बाहेर
Retail inflation outside RBI limits

मे महिन्यात महागाई दराची आकडेवारी रिझर्व्ह बँकेच्या (RBI) मर्यादेच्या बाहेर गेली आहे. जी 2 ते 6 टक्क्यांच्या दरम्यान आहे. याआधी किरकोळ महागाई (Retail Inflation) सलग पाच महिने याच मर्यादेमध्ये होती. परंतु इंधनाच्या वाढत्या किंमतींमुळे महागाईने सर्वसामान्यांची कंबर मोडली आहे. मे मध्ये खाद्यपदार्थ 5.01 टक्के महाग झाले. जे एप्रिलमध्ये फक्त 2.02 टक्केच महाग झाले होते.

तेल आणि मांसाहारी वस्तूंनी बिघडवले अंदाजपत्रक
Oil and non-vegetarian goods spoiled the budget

अहवालानुसार, मे महिन्या दरम्यान तेल आणि चरबी सर्वात महाग झाले आहेत. एका महिन्यात ते जवळपास 31 टक्के महाग झाले आहे. त्याचप्रमाणे अंडी आणि शितपेयांच्या किंमतीही 15-15 टक्क्यांनी वाढल्या आहेत. परंतू भाज्या आणि साखरेसह मिठाईच्या वस्तूंच्या किंमतीत 2 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. परंतु इतर सर्व वस्तूंमध्ये महागाई दिसून आली आहे.
 

घाऊक महागाई देखील सलग पाचव्या महिन्यात वाढली
Wholesale inflation also rose for the fifth consecutive month

पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळे घाऊक महागाई (Retail Inflation) दर विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार घाऊक महागाई दर मेमध्ये 12.94 टक्क्यांवर पोहोचला आहे. मे 2020 मध्ये ते उणे 3.37 टक्के होता.
Inflation in petrol, diesel and food items has pushed the country’s retail inflation to a six-month high. Retail inflation, as measured by the Consumer Price Index (CPI), was 6.3 per cent in May, according to government data. It was 4.23 percent in April.
PL/KA/PL/15 JUNE 2021
 

mmc

Related post