किलीमांजारो शिखरावर भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन

 किलीमांजारो शिखरावर भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन

मुंबई दि.4 (एम एमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय प्रजासत्ताक दिनी आफ्रिका खंडातील सर्वाधिक उंचीचे किलीमांजारो (१९,३४१ फूट) पर्वत सर करुन, तेथे शिखरावर तिरंगा फडकावून संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करण्याची कामगिरी पालिकेच्या उद्यान विभागातील उद्यान विद्या सहायक तथा गिर्यारोहक सीमा माने यांनी पार पाडली होती. त्यांच्या या गिर्यारोहण कामगिरीची ‘हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ या संघटनेने दखल घेत माने यांना प्रशस्तिपत्र आणि पदक देवून नुकतेच सन्मानित केले. या अभिमानास्पद कामगिरीबद्दल माने यांचा पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी शुक्रवारी सत्कार केला.

सीमा माने यांनी गत दोन वर्षांत अनेक मोहिमा फत्ते केल्या आहेत. किलीमांजारो (१९,३४१ फूट ) शिखर सर करणाऱया त्या पालिकेच्या पहिल्या महिला कर्मचारी आहेत. मूळच्या सातारा येथील रहिवासी असलेल्या माने यांनी सर्वप्रथम मे २०२२ मध्ये काश्मिर येथील प्रशिक्षण शिबिरात सहभाग घेतला. तेव्हापासून त्या गिर्यारोहणाचा छंद जोपासत आहेत. ‘हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ या संघटनेने आतापर्यंत मिल्खा सिंग, सनथ जयसूर्या, विराट कोहली, सानिया मिर्झा, मिथाली राज, पी. व्ही. सिंधू अशा विविध दिग्गजांचा गौरव केला आहे. आता या पुरस्कार्थींच्या यादीत पालिकेच्या उद्यानविद्या सहायक सीमा माने यांचाही समावेश झाला आहे.

किलीमांजारो शिखर सर करुन तेथे संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन केले, या कामगिरीबद्दल पालिका आयुक्त गगराणी यांनी माने यांचा आज सत्कार केला. यावेळी उद्यान अधीक्षक . जितेंद्र परदेशी उपस्थित होते. दरम्यान, येत्या जून (२०२४) महिन्यात माने या उत्तराखंड येथे ‘भगिरथी २’ मोहिमेत सहभागी होणार आहेत. त्यांच्या या मोहिमेलाही मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

SW/ML/SL

4 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *