धुळ्यात वंचित बहुजन आघाडी उमेदवाराचा अर्ज अपात्र

 धुळ्यात वंचित बहुजन आघाडी उमेदवाराचा अर्ज अपात्र

धुळे, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : धुळे लोकसभा मतदारसंघात कालच्या शेवटच्या दिवशी एकूण 30 उमेदवारांचे कूण 42 अर्ज दाखल केले होते. धुळे लोकसभा मतदारसंघातील आजच्या छाननीच्या दिवशी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल आणि केंद्रीय निवडणूक निरीक्षक पूर्ण चंद्र सहाय तसेच उमेदवार तसेच त्यांचे प्रतिनिधी यांच्या यांचे उपस्थितीत छावणीची प्रक्रिया पार पडली.

भारतीय जनता पक्षाचे डॉक्टर सुभाष भामरे तसेच काँग्रेसचे डॉक्टर शोभा बच्छाव यांच्यासह एकूण 22
पात्र झालेत तर 8 उमेदवाराचे अर्ज अपात्र झालेत. धुळे लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोठा शक्तिप्रदर्शन करत स्वेच्छा निवृत्ती घेतलेले आयपीएस अधिकारी अब्दुल रेहमान यांनी आपली उमेदवारी दाखल केली होती, परंतु आज छाननीत त्यांचा उमेदवारी अर्ज अपात्र झाल्याने वंचित बहुजन आघाडीस धक्का बसला आहे. वकिलांचा सल्ला घेऊन ते पुढील निर्णय करणार असून आगामी काळात कोणाला पाठिंबा द्यायचा हे पक्षश्रेष्ठी ठरवणार असल्याचे अब्दुल रेहमान यांनी सांगितले.

ML/ML/SL

4 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *