रिझर्व्ह बँक पुढील वर्षी हा नियम लागू करणार
मुंबई, दि.11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ऑक्टोबर 2022 पासून 50 कोटी किंवा त्याहून अधिक रकमेच्या परदेशातील व्यवहारांसाठी कंपन्यांना 20-अंकी कायदेशीर अस्तित्व ओळखकर्ता ( Legal Entity Identifier ) क्रमांक नमूद करावा लागेल. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) शुक्रवारी ही माहिती दिली. एलईआय हा 20-अंकी क्रमांक आहे जो आर्थिक व्यवहारातील पक्षांची ओळख निश्चित करतो. आर्थिक आकडेवारीशी संबंधित प्रणालीची गुणवत्ता आणि अचूकता सुधारण्यासाठी जगभरात याचा वापर केला जातो.
रिझर्व्ह बँकेने एका परिपत्रकात म्हटले आहे की भारतातील कंपन्यांना 50 कोटी किंवा त्याहून अधिक रकमेच्या परदेशातील व्यवहारांसाठी 1 ऑक्टोबर 2022 पासून बँकांकडून एलईआय ( Legal Entity Identifier ) क्रमांक प्राप्त करुन घ्यावे लागतील. ही तरतूद फेमा (परदेशी विनिमय व्यवथापन कायदा) कायदा, 1999 अंतर्गत करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की परदेशी कंपन्यांसंदर्भात एलईआय ची कोणतीही माहिती उपलब्ध न झाल्यास, बँका व्यवहार पूर्ण करू शकतात.
रिझर्व्ह बँक टप्प्याटप्प्याने भारतीय वित्तीय प्रणालीमध्ये एलईआय लागू करत आहे. ती ओटीसी डेरिव्हेटिव्ह्ज, नॉन-डेरिव्हेटिव्ह बाजारपेठा, मोठे कॉर्पोरेट कर्जदार आणि उच्च मूल्याच्या व्यवहारांमध्ये सहभागींसाठी एलईआय ( Legal Entity Identifier ) लागू करत आली आहे. केंद्रीय बँकेने म्हटले आहे की बँका कंपन्यांना 1 ऑक्टोबर 2022 पूर्वीही 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त परदेशी व्यवहारांसाठी एलईआय क्रमांक जारी करण्यासाठी प्रोत्साहित करू शकतात. मात्र एकदा एलईआय क्रमांक जारी केल्यावर, कंपनीने सर्वप्रकारच्या व्यवहारांमध्ये त्याचा उल्लेख करणे आवश्यक असेल.
From October 2022, companies will be required to provide a 20-digit legal entity identifier number for overseas transactions of Rs 50 crore or more. The Reserve Bank of India (RBI) said this on Friday. LEI is a 20-digit number that determines the identity of the parties involved in financial transactions.
PL/KA/PL/11 DEC 2021