धोरणात्मक व्याजदर कायम, महागाईवर लक्ष

 धोरणात्मक व्याजदर कायम, महागाईवर लक्ष

नवी दिल्ली, दि.9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI)बुधवारी अपेक्षेप्रमाणे प्रमुख धोरणात्मक रेपो दर 4 टक्के कायम ठेवला. कोरोना विषाणूचा नवा प्रकार ओमिक्रॉन संदर्भातील अनिश्चिततेच्या दरम्यान आर्थिक विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने केंद्रीय बँकेने विक्रमी सलग नवव्यांदा धोरणात्मक दर कमी ठेवण्याचा निर्णय घेतला. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikant Das) म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्था कोरोनाच्या संकटातून बाहेर आली आहे, परंतु ती अद्याप स्वावलंबी आणि विश्वासार्ह होण्याइतकी मजबूत नाही.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikant Das) यांनी 2021-22 साठी जीडीपी वाढीचा अंदाज 9.5 टक्के कायम ठेवला. तसेच चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत विकास दर 6.6 टक्के आणि चौथ्या तिमाहीत 6.0 टक्के राहण्याची शक्यता आहे असेही सांगितले.

 

दास म्हणाले की, रिझर्व्ह बँक महागाईवर बारीक लक्ष ठेवून आहे. अजूनही महागाई रिझर्व्ह बँकेच्या आधीच्या अंदाजाच्या जवळपासच आहे. थोड्या काळासाठी किंमती संबंधीचा दबाव कायम राहण्याची शक्यता आहे. ते म्हणाले की, ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित महागाई चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत 5.1 टक्के आणि चौथ्या तिमाहीत 5.7 टक्के राहण्याची शक्यता आहे. एकंदरित 2021-22 मध्ये ती 5.3 टक्के राहण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे, 2022-22 च्या पहिल्या तिमाहीत ती कमी होऊन पाच टक्के होण्याची आणि दुसऱ्या तिमाहीत पाच टक्क्यांवरच राहण्याची शक्यता आहे. ते म्हणाले की, चलनविषयक धोरणाची भूमिका प्रामुख्याने वाढती देशांतर्गत चलनवाढ आणि वाढीच्या घडामोडींच्या अनुकुल आहे.

चलनविषयक धोरणाच्या आढाव्याबद्दल माहिती देताना, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikant Das) म्हणाले की, अर्थव्यवस्थेतील मंदी अद्याप संपलेली नाही आणि विशेषत: खाजगी वापर आणि इतर अनेक उपक्रम अजूनही साथीच्या पूर्व पातळीच्या खाली आहेत. त्यामुळे, मजबूत आणि व्यापक-आधारित पुनरुज्जीवनासाठी शाश्वत धोरणात्मक समर्थनाची गरज आहे.

The Reserve Bank of India (RBI) on Wednesday maintained the key policy repo rate at 4 per cent as expected. The central bank has decided to cut policy rates for a record ninth time in a row in a bid to boost economic growth amid uncertainty over the new type of corona virus, Omicron.

PL/KA/PL/09 DEC 2021

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *