मार्च महिन्यात औद्योगिक कर्ज घटले
नवी दिल्ली, दि.1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी चिंता वाढवणारी आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार मार्च 2021 मध्ये देशातील औद्योगिक कर्जवाढीमध्ये (industrial debt) घट नोंदवण्यात आली आहे. ही घट गेल्या संपूर्ण आर्थिक वर्षात दिसून आली आहे. इतकेच नव्हे तर रिझर्व्ह बँकेच्या याच आकडेवारीनुसार खासगी कॉर्पोरेट क्षेत्राची पत सलग सहाव्या तिमाहीत घटल्याचे दिसले आहे. सलग सहा तिमाही म्हणजेच दीड वर्ष खासगी कॉर्पोरेट क्षेत्राची पत नकारात्मक रहाणे हे अर्थव्यवस्थेतील साथीच्या आधीपासून सुरु असलेल्या आर्थिक मंदीचेच लक्षण आहे.
औद्योगिक कर्ज कमी, वैयक्तिक कर्जात 13.5 टक्क्यांची वाढ
Industrial debt down, personal debt up 13.5 per cent
रिझर्व्ह बँकेच्या (RBI) म्हणण्यानुसार मार्च 2021 मध्ये औद्योगिक कर्जात (industrial debt) घट होण्याच्या अगदी उलट वैयक्तिक कर्जात 13.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. घरगुती क्षेत्र म्हणजेच घरगुती वापरासाठी घेण्यात येणार्या कर्जामध्येही मार्च 2021 मध्ये गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 10.9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. काही कर्जात क्षेत्राचा वाटाही वाढून 52.6 टक्के झाला आहे, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीत 49.8 टक्के होता.
खासगी कॉर्पोरेट क्षेत्रातील पत सलग सहाव्या तिमाहीत घसरली
Credit of the private corporate sector fell for the sixth consecutive quarter
त्या तुलनेत, खासगी कॉर्पोरेट क्षेत्रातील पत सलग सहाव्या तिमाहीत घसरत आहे आणि एकूण कर्जात त्याचा वाटा 28.3 टक्के आहे. कार्यरत भांडवलासाठी कॅश क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट आणि डिमांड लोन या स्वरूपात घेतलेल्या कर्जातही 2020-21 दरम्यान घट झाल्याचे पहायला मिळाले आहे. एकूण कर्जात अशा कर्जाचा वाटा सुमारे एक तृतीयांश आहे. रिझव्र्ह बँकेच्या (RBI) या आकडेवारीचा विचार करता, एकीकडे औद्योगिक कर्ज (industrial debt), कार्यरत भांडवली कर्ज आणि खासगी कॉर्पोरेट क्षेत्राच्या पत मध्ये घट आणि दुसरीकडे वैयक्तिक कर्जात वाढ, आर्थिक घडामोडींमध्ये मंदी सुरु रहाणे आणि वैयक्तिकरित्या सर्वसाधारण लोकांमधील आर्थिक अडचणी वाढण्याची लक्षणे नाहीत तर आणखी काय आहे असा प्रश्न निर्माण होणे साहजिक आहे.
रिझर्व्ह बँकेने (RBI) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार बँकांच्या शहरी, निम-शहरी आणि ग्रामीण भागातील शाखांमध्ये मार्च 2021 मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत दुहेरी आकडी पतवाढ झाली, तर महानगरांमधील शाखांची पतवाढ केवळ 1.4 टक्के होती. या आकडेवारीचे महत्त्व एकूण बँक पत मध्ये या महानगर शाखांचा वाटा 63 टक्के आहे यावरुन समजू शकेल.
The Reserve Bank of India (RBI) has released figures that raise concerns about the country’s economy. According to these figures, the country’s industrial debt growth has declined in March 2021. This decline has been seen throughout the last financial year. Not only that, according to the same RBI data, the credit of the private corporate sector has declined for the sixth consecutive quarter.
PL/KA/PL/1 JULY 2021