मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस
परभणी, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): हिंगोली, जालना , लातूर आणि परभणी या जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला आहे,त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.Rain with strong winds in Marathwada
या जिल्ह्यातील अंबड, रेणापूर, हिंगोली शहर पूर्णा,मानवत,पलम, गंगाखेड तालुक्यासह अनेक भागात आज पुन्हा वादळी वाऱ्यासह गारपिटीने झोडपले असून गारांचा खच पडलेला दिसून येत आहे.रब्बीची काढणीला आलेले ज्वारी,गहू,हळद पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याने झाडे पडली आहेत.
काही ठिकाणची घरावरील पत्रे उडून गेल्याने घरांचे नुकसान झाले. नुकसान झालेल्या ठिकाणी शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
वादळी वारा आणि गारपिटीचा अंदाज आल्यास माणसांनी सुरक्षित ठिकाणी निवारा घ्यावा तसेच पशुधन सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
ML/KA/PGB
18 Mar. 2023