‘ यामुळे ‘ आता राहुल गांधींच्या ही आशा झाल्या पल्लवीत

नवी दिल्ली, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोदी या नावाची बदनामी केल्यामुळे मानहानीचा गुन्हा दाखल झालेल्या राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षाची सजा सुनावली. याची दखल घेत लोकसभेने त्यांचे सदस्यत्त रद्द केले. त्यामुळे कॉग्रेससह देशातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. हे प्रकरण ताजे असतानाच आता लोकसभेने अन्य एका गुन्हा दाखल झालेल्या लोकसभा सदस्याला रद्द झालेली खासदारकी परत देऊ केल्याने राहुल गांधी यांची पुन्हा एकदा खासदार पदी येण्याच शक्यता निर्माण झाली आहे.
लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैसल यांना हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर, लोकसभा सचिवालयाने 13 जानेवारी रोजी एक अधिसूचना जारी करून मोहम्मद फैसलचे सदस्यत्व रद्द केले. मोहम्मद फैसलने त्याच्या शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात अपील केले तेव्हा त्याच्या शिक्षेला 25 जानेवारी रोजी स्थगिती देण्यात आली. मात्र, शिक्षेवर बंदी असतानाही लोकसभा सचिवालयाने त्यांचे सदस्यत्व बहाल केले नाही. याविरोधात मोहम्मद फैसल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होण्यापूर्वी लोकसभा सचिवालयाने मोहम्मद फैसल यांना खुशखबर दिली आहे. लोकसभा सचिवालयाने लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैसल यांचे संसदीय पद बहाल केले आहे. उच्च न्यायालयाने आपल्या शिक्षेला स्थगिती देऊनही आपले सदस्यत्व बहाल केले नसल्याची याचिका मोहम्मद फैसल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.
राष्ट्रवादीचे नेते मोहम्मद फैसल आणि इतर 3 जणांना हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नियमांनुसार 2 वर्षांच्या शिक्षेनंतर विधिमंडळ किंवा संसद रद्द केली जाते. त्यावर कारवाई करत लोकसभेने त्यांचे सदस्यत्व रद्द केले होते मात्र या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्या नंतर आता लोकसभेने त्यांना खासदारकी परत केली आहे.
दरम्यान वरील प्रकरणामुळे सुरत न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेनंतर राहुल गांधी यांना जामिनही मंजुर केला आहे. त्यामुळे वरील प्रकरणाचा संदर्भ पाहता राहुल गांधी यांनाही खासदार पद परत मिळू शकते अशी शक्यता निर्माण झाली आहे.
SL/KA/SL
29 March 2023