राहुल गांधीनी धारण केला हमालाचा वेश

नवी दिल्ली, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राहुल गांधी आज नवी दिल्लीतील आंनद विहार रेल्वे स्टेशनवर दाखल झाले व त्यांनी हमालांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधींनी हमालाचा वेश धारण करत डोक्यावरून सामानाची बॅग घेतल्याचेही दिसून आले. राहुल गांधी आणि यूथ काँग्रेसने इंस्टाग्राम व ट्विटरवर फोटो व व्हिडिओ शेअर केले आहेत. राहुल गांधींनी हमालांशी संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या.
हमालांशी संवाद साधतानाचे फोटो राहुल गांधी यांनी इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्याच्या कॅप्शनमध्ये राहुल गांधी यांनी लिहिले आहे की, “खूप काळापासून माझ्या मनात हमालांना भेटण्याची इच्छा होती. त्यांनीही मला मोठ्या प्रमाणे बोलावले होते. भारताच्या मेहनती बांधवांची इच्छा कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होणारच होती. ”
दरम्यान राहुल यांनी शेअर केलेल्या फोटोत त्यांनी हमालाच्या वेशात डोक्यावर घेतलेल्या बॅगला चाक असल्याचे दिसून येत आहे. यावरून चाक असलेली बॅग डोक्यावर घेण्याची काय गरज होती, असा सवाल उपस्थित करत सोशल मिडियावर त्यांना ट्रोल करण्यात येत आहे.
SL/KA/SL
21 Sept. 2023