मेडिकल मध्ये रॅगिंग, सहा विद्यार्थ्यांची इंटर्नशिप रद्द

 मेडिकल मध्ये रॅगिंग, सहा विद्यार्थ्यांची इंटर्नशिप रद्द

नागपूर, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थात मेडिकल मध्ये इंटर्नशिप करीत असलेल्या 6 विद्यार्थ्यांनी मिळून MBBS च्या प्रथम वर्षाला असलेल्या विद्यार्थांची रॅगिंग घेतल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.Raging in medical, internship of six students cancelled

त्यामुळे या रॅगिंग प्रकारची आरोग्य विभागाच्या रॅगिंग विरोधी समितीने याची गंभीर दखल घेऊन रॅगिंग घेणाऱ्या सर्व सहाही विद्यार्थ्यांना वसतिगृहाचा बाहेर काढून त्यांची इंटर्नशिप रद्द केली आहे . लवकरच त्यांच्यावर पोलिसात तक्रारही दाखल केली जाणार आहे .

MBBS चा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर शासकीय रुग्णालयात 1 वर्ष रुग्ण सेवा देण्याला इंटर्नशिप म्हटले जाते . या 6 विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थांची रॅगिंग घेत त्याचा गालावर थापड मारल्याचे स्पष्ट होताच या 6 विद्यार्थ्यांचा विरोधात कारवाई केल्याचे मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी सांगितले आहे.

ML/KA/PGB
30 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *