उद्या अवकाशात झेपावणार ISRO चं ‘बेबी रॉकेट’

 उद्या अवकाशात झेपावणार ISRO चं ‘बेबी रॉकेट’

श्रीहरीकोटा, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उद्या इस्रोचं छोटं रॉकेट, ज्याला ‘बेबी रॉकेट’ म्हणतात, EOS-8 नावाच्या अर्थ इमेजिंग सॅटेलाइटसोबत लाँच करण्यात येणार आहे. या सोबतच SR-0 नावाचं डेमो सॅटेलाइट देखील अवकाशात नेला जाणार आहे. SR-0 म्हणजेच ‘स्पेस रिक्षा’ या नावाचा सॅटेलाईट चेन्नईमधील एका स्टार्टअपने हा सॅटेलाइट तयार केला आहे. श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रातून EOS-8 आणि SR-0 चे प्रक्षेपण होणार आहे.

हे प्रक्षेपण खास आहे कारण भारताने छोट्या रॉकेटवर विश्वास दाखवत त्याचा वापर प्रक्षेपणासाठी करणार आहे. बेबी रॉकेटचं खरं नाव स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (SSLV) आहे. रिपोर्टनुसार, यूआर राव सॅटेलाइट सेंटर (यूआरएससी) चे संचालक डॉ. एम. शंकरन यांनी सांगितले की EOS-8 हा एक असा सॅटेलाइट आहे ज्यात भविष्यातील तंत्रज्ञानांचा वापर करण्यात आला आहे. या सॅटेलाइटचं वजन 175 किलो आहे.

स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (SSLV) चं पहिलं प्रक्षेपण 2022 साली अयशस्वी ठरलं होतं. मात्र, 10 फेब्रुवारी 2023 रोजी झालेलं दुसरं प्रक्षेपण यशस्वी झालं. इस्रोच्या मते, तिसऱ्या प्रक्षेपणानंतर SSLV साठी तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्राला ट्रान्सफर केलं जाऊ शकतं. स्पेस रिक्षा नावाच्या सॅटेलाइटचं वजन फक्त अर्धा किलो आहे.

SL/ML/SL
15 August 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *