बुद्धिमान समाजासाठी हवाप्रदूषण रोखणे गरजेचे

 बुद्धिमान समाजासाठी हवाप्रदूषण रोखणे गरजेचे

मुंबई, दि. 22 (राधिका कुलकर्णी): मुलगा : “आई, मी नाही जाणार इतक्या लांब त्या रिक्षाकाकांबरोबर त्या शाळेत. इतकी गर्दी असते त्या
रस्त्यावर आणि त्या गाड्यांच्या धुरामुळे माझं डोकं दुखतं, डोळे चुरचुरतात आणि दम लागतो सारखा.”
Mom, I will not go to school. Feeling headache due to smoke from the cars, breathlessness
etc. while going to school so long by rickshaw.
आई: “ अरे, असं म्हणून कसं चालेल? ती शाळा चांगली आहे म्हणून त्या शाळेत तुला घातलं. शिकायचं तर
एवढा त्रास सहन करायला पाहिजे.” आई असं म्हणतेय तोच मुलाला चक्कर आली आणि आईची त्याला
डॉक्टरांकडे नेण्याची धावपळ सुरु झाली.“Oh, how can that be? You have to suffer so much to
learn.” As soon as the mother says this, the child gets dizzy and the mother starts rushing
him to the doctor.
मित्रांनो, थोड्याफार फरकाने अशा प्रकारचे त्रास होत असल्याच्या तक्रारी बहुतेक शहरांमध्ये आणि
खेडेगावातही आपण ऐकतो. पण याच्या मूळ कारणांचा विचार आपण केला आहे का? त्यानुसार आपल्या
जीवनशैलीत काही बदल आपण करतो आहोत का, आणि मानवालाच नव्हे तर सजीवाला अनुकूल निर्णय
घेण्यास गावपातळीपासून राज्य पातळीपर्यंत सरकारला आपण भाग पडणार आहोत का, हा खरा प्रश्न आहे.
Friends, are we going to change our lifestyle? Are we going to insist Government to
implement the rules which are nature friendly?
करोना काळात काही प्रमाणात हवा प्रदूषण काहीसे कमी झाले हे आपण अनुभवले. पण जरा कुठे मोकळीक
मिळाली की गर्दी करण्याची आपली सवय अजूनही गेलेली नाही.
रस्त्यावर येणाऱ्या खासगी गाड्या, त्याचबरोबर औद्योगिक कारखाने, अति थंडीच्या किंवा अति उष्ण
प्रदेशात वापरले जाणारे हीटर किंवा वातानुकूलन यंत्र, विमान प्रवास, कोळसा प्रकल्प आणि कृषि
उत्पादनांवर होणाऱ्या प्रक्रिया या सगळ्यांमुळे हरितगृहवायू उत्सर्जन होते. पाण्याची वाफ, कर्बवायू ,
मिथेन, नायट्रस ऑक्साइड, ओझोन यांना हरितगृह वायू म्हणून ओळखले जाते. या सगळ्यांचे प्रचंड
प्रमाणात उत्सर्जन होत आहे. हवामान बदल, तापमान वाढ आणि जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांचे हेच
कारण ठरले आहे. Private cars, industry, heater or air conditioners, air travel, coal projects and
processes on agricultural products causes Green House Gas (GHG) emission. Climate change
is one of the main causes of global warming and lifestyle diseases.
२७ ऑगस्ट २०१८ रोजी ‘द गार्डियन’ मध्ये एक लेख प्रसिद्ध झाला होता. त्यात त्यांनी चीनमध्ये झालेल्या
एका संशोधनाचा हवाला दिला होता. ते संशोधन जगभर सगळ्यांना लागू होते. जगातील ९५% लोक
असुरक्षित हवा श्वासोच्छ्वासाद्वारे घेतात. 95% of the global population breathing unsafe air.
हवा प्रदूषणामुळे मानवाच्या बुद्धिमत्तेचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत असल्याचा निष्कर्ष या संशोधनातून
काढला होता. अतिशय उच्च पातळीच्या विषारी हवेमुळे होणारा परिणाम हा शिक्षणातील एक वर्ष वाया
गेल्याइतका आढळला. विद्यार्थ्यांच्या भाषिक आणि अंकगणिती कौशल्यांमध्ये लक्षणीय घट झालेली

आढळली. Impact of high levels of toxic air is equivalent to having lost a year of education.
The research is relevant across the world. High pollution levels led to significant drops in test
scores in language and arithmetic.
मुलांमध्ये मानसिक विकार आणि मानसिक आजार वाढत असल्याचेही निष्कर्ष निघाले. It was concluded
that mental disorders and mental illnesses were on the rise in children.
अत्यंत रहदारीच्या रस्त्याजवळ राहणाऱ्यांना विचारशक्ती, स्मृती आणि नेहमीची सर्वसामान्य वागणूक
यांनी बाधित होऊन मेंदूसंबंधित बुद्धिभ्रंश, अवमनस्कता अशा गंभीर मानसिक समस्यांना सामोरे जावे
लागले. Living nearby busy roads had an increased risk of dementia.
हवा प्रदूषणामुळे होत असलेल्या शारीरिक हानीपेक्षा हे मानसिक परिणाम अत्यंत गंभीर आहेत आणि याची
लोकांना फारशी माहितीही नाही. These mental consequences are far more serious than physical
harm and people are not aware of it.
त्यातही ६४ वर्षे वयाच्या वरील पुरुष व्यक्तींना, कमी शिकलेल्यांना हवा प्रदूषणामुळे होणारा त्रास जास्त
आहे. सामान्यतः या वयात गुंतागुंतीचे आर्थिक निर्णय घेण्याची वेळ या व्यक्तींवर येत असते. The effect or
the damage in intelligence is worse for the elderly, especially those over 64 years old. We
usually make the most critical financial decisions in old age.
मनोविकारग्रस्त व्यक्तींमध्ये हवा प्रदूषणामुळे मृत्युदरही अधिक आढळला. Toxic air was linked to
extremely high mortality in people with mental disorders.
एका वर्षात ७ कोटी भ्रूणांच्या पूर्ण वाढीपूर्वीच होणाऱ्या मृत्यूला प्रदूषित हवाच जबाबदार आहे. Air
pollution causes seven million premature deaths a year.
बुद्धिमान माणसांचा समाज हाच त्यात्या देशाचे खरे भांडवल असते. हे जर मान्य असेल तर हा बुद्धिमत्तेचा
ऱ्हास थांबवण्यासाठी प्रत्येक सरकारने खंबीर पावले उचलली पाहिजेत. कारण अर्थव्यवस्था बाळसेदार
व्हायची असेल तर बुद्धिमान समाजच महत्त्वाचा आहे. याला सोपी रीत किंवा जवळचा मार्ग नाही.
Intelligent humans are capital of a country, which is one of the most important driving
forces of economic growth. Every government should take important measures to stop the
decreased intelligence level. There is no short cut to solve this issue. (The Guardian, article
published on 27 th August 2018 and modified on 3 rd Feb.2020)
‘लंडन स्मॉग ऑफ १९५२’ किंवा ‘द ग्रेट स्मॉग’ (London smog of 1952 or The Great Smog)असो
किंवा अमेरिकेतील ‘डाऊनविंडर्स’ (Downwinders of U.S.)या नावाने ओळखल्या जाणाऱ्या घटना
हवामान बदल आणि त्यामुळे होणारे नुकसान किंवा मानवाचा निसर्गातील हस्तक्षेप मानवालाच किती
नुकसानकारक ठरतो हे सांगतात. डिसेंबर १९५२ मध्ये लंडनमध्ये कडाक्याची थंडी पडली होती. त्यापासून
बचाव करण्यासाठी लोकांनी अधिकाधिक कोळसा जाळला. त्यातून निघणारा धूर आणि इतर प्रदूषक
लंडनच्या आकाशात आधीपासून असलेल्या धुक्यात पकडले गेले. त्या प्रदूषित धुक्याचा थर इतका दाट
होता की, लोकांना फक्त काही मीटर अंतरावार्चेच दिसू शकत होते. त्या थंडीत १ लाख लोक आजारी पडले
होते आणि १२ हजार लोकांचा मृत्यू झाला होता. स्मोक(धूर) आणि फॉग(धुके) एकत्र येऊन झालेले

प्रदूषण(ज्याला स्मॉग म्हणून ओळखतात) लंडनवासियांना इतके महाग पडले. One Lakh people were ill
and 12 thousand deaths…
आत्ताही इंग्लंडमधली हवा शुद्ध नाही. तेथील डॉक्टरांनी ‘डॉक्टर्स अगेन्स्ट डिझेल’ ही मोहीमच चालवली
आहे. हवा प्रदूषणामुळे आपल्या आकलन क्षमतेवर अत्यंत वाईट परिणाम होतो. नागरिक वसाहतीजवळ
होत असणाऱ्या वाहतुकीमुळे जे प्रदूषण होते त्याचा त्रास सगळ्यात मोठा आहे असे ही मोहीम चालवणाऱ्या
डॉक्टरांचे म्हणणे आहे. म्हणूनच सरकारने जास्त प्रदूषण करणाऱ्या वाहनांना ताबडतोब रस्त्यांवरून
हटवले पाहिजे, असेही हे डॉक्टर्स म्हणतात. Doctor Against Diesel campaign in U.K.
Exposure to air pollution can worsen our cognitive function. Road traffic is the biggest
contributor to air pollution in residential areas and the government needs to act urgently to
remove heavily polluting vehicles from our roads.
आपल्या भारतातही हीच गोष्ट लागू आहे. वैध पातळीपेक्षा अधिक प्रदूषण होण्यास कारणीभूत असलेली
वाहने हटवण्यासाठी प्रत्येक राज्यांच्या सरकारने युद्ध पातळीवर निर्णय घेणे आणि अंमलबजावणी करणे
अतिशय गरजेचे आहे. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक उत्तम देण्यासाठी नागरिकांनी पाठपुरावा
करून राज्यकर्त्यांना भाग पाडले पाहिजे. The same is true in India. It is imperative for the state
government to take and implement war level decisions to eradicate polluting vehicles. In
order to improve the public transport system, the citizens should follow up and force the
rulers to implement good policies.
अमेरिकेतील घटना आणखी विदारक आहे. १९५० च्या दशकात नेवाडा चाचणी स्थळावर अमेरिकेने
अण्वस्त्रांच्या चाचण्या केल्या. या चाचण्यांच्या वेळी अदृश्य किरणोत्सर्गी कण वातावरणात गेले. हवा
प्रदूषित करणारे हे कण वाऱ्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जाऊन शेवटी शेकडो मैल दूर असलेल्या
इडाहो,युटा, अॅरिझोना आणि वॉशिंग्टन या राज्यांमध्ये पडले. हा सगळा नेवाडा चाचणी स्थळाचा
डाऊनविंड भाग म्हणून ओळखला जातो. काही दशकांनंतर डाऊनविंडर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या
लोकांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त कर्करोगाचे रुग्ण आढळू लागले. नंतर १९९० मध्ये अमेरिकेच्या सरकारने
किरणोत्सारी संसर्ग नुकसानभरपाई कायदा संमत केला. हा कायदा काही डाऊनविंडर्सना ५० हजार
डॉलर्सच्या देयकास पात्र ठरतो. Downwinders of U.S. – The U.S. conducted tests of nuclear
weapons at the Nevada Test Site in Southern Nevada in the 1950s. These tests sent invisible
radioactive particles into the atmosphere. These air pollution particles travelled with wind
current, eventually falling to earth, sometimes hundreds of miles away in states including
Idaho, Utah, Arizona and Washington. These areas were considered to be ‘downwind’ from
the Nevada Test Site. Decades later, people living in those areas called ‘downwinders’ began
developing cancer at above normal rates. In 1990, the U.S. Govt. passed the Radiation
Exposure Compensation Act. This law entitles some downwinders to payment of $50,000.
देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी असलेली मुंबई ही दोन्ही शहरे जगातील सर्वाधिक
प्रदूषित शहरांमध्ये गणली जातात. तर जगातील १५ पैकी १३ प्रदूषित शहरे ही भारतात आहेत. Delhi as
a Capital of India and Mumbai as an Economic Capital of India are considered to be one of
the most polluted cities in the world and 13 out of 15 cities which are most polluted in the

world are from India. IQAir’s World Air Quality Report (Swiss Air Quality Technology
Company)
आपण डोळसपणे जगणे, निसर्गाचा आदर करत जगणे आपल्या स्वतःसाठी तरी अंगिकारणार आहोत का?
आपल्याला सकस आणि समृद्ध जगत देशालाही सर्व दृष्टींनी समृद्ध करायचे आहे का? उत्तर आपल्याच
हातात आहे! Are we going to live with dignity and respect nature? Are we going to enrich our
country in all respects? The answer is with us only!
Radhika Kulkarni, A freelance Journalist & Climate Reality Leader-Mentor, Climate Reality
Project, India Branch,

k_radhika@hotmail.com

ML/KA/PGB
22 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *