‘हुमणी’ अळीचा सोयाबीन, तूर, कपाशीवर प्रादुर्भाव …

बुलडाणा, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यावर्षी पावसाच्या अनियमिततेमुळे तसेच हवामान बदलामुळे कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे. मागील काही दिवसांपासून सोयाबीन पिकांवर हुमणी अळींचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सोयाबीन पिकांवर हुमणी, खोडकिडी या किडीचा तसेच विषाणूजन्य पिवळा मोझॅक रोगाचा, तर कपाशीवर मावा किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत आहेत. अपुरा पाऊस आणि कडक उन यामुळे खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेकडो हेक्टर शेती धोक्यात आल्यामुळे शेतकरी डोक्याला हात लावून बसत आहेत.
ML/KA/SL
5 Sept. 2023