९६ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नरेंद्र चपळगावकर

 ९६ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नरेंद्र चपळगावकर

वर्धा,दि.८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वर्धा येथे होणाऱ्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखक, विचारवंत न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.

चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायाधीश आहेत. वैचारिक लेखन करणारे एक संवेदनाशील  लेखक म्हणून ते परिचित आहेत. न्यायाधीश होण्यापूर्वी ते १९६१-६२ मध्ये ते लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख होते. २३-१०-२००३ पासून ते गरवारे पॉलिएस्टर लिमिटेडचे स्वतंत्र अकार्यकारी निदेशक आहेत. ते नरहर कुरुंदकर न्यासाचे विश्वस्तही आहेत.

चपळगावकरांची साहित्य संपदा

– अनंत भालेराव : काळ आणि कर्तृत्व

– आठवणीतले दिवस

– कर्मयोगी संन्यासी (स्वामी रामानंदतीर्थ यांचे चरित्र)

– कायदा आणि माणूस

– कहाणी हैदराबाद लढ्याची

– तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ

– तुमच्या माझ्या मनातलं (ललित)

– त्यांना समजून घेताना (ललित)

– दीपमाळ (भाषाविषयक, साहित्य आणि समीक्षा)

– नामदार गोखल्यांचा भारत सेवक समाज

– नामदार गोखल्यांचं शहाणपण

– न्यायमूर्ती केशवराव कोरटकर

– न्यायाच्या गोष्टी (न्यायविषयक कथा)

– मनातली माणसं (व्यक्तिचित्रणे)

– महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना

– राज्यघटनेचे अर्धशतक

– विधिमंडळे आणि न्यायसंस्था : संघर्षाचे सहजीवन

– संघर्ष आणि शहाणपण

– समाज आणि संस्कृती

– संस्थानी माणसं (व्यक्तिचित्रणे)

– सावलीचा शोध (सामाजिक)

– हरवलेले स्नेहबंध

SL/KA/SL

8 Nov. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *