काँग्रेसचे ट्विटर हँडल ब्लॉक करण्याच्या कोर्टाचे आदेशाला उच्च न्यायालयाकडून स्थगिती

 काँग्रेसचे ट्विटर हँडल ब्लॉक करण्याच्या कोर्टाचे आदेशाला उच्च न्यायालयाकडून स्थगिती

बंगळुरु, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केजीएफ-2 गाण्याचा वापर करून कॉपीराईटचा भंग केल्या प्रकरणी  काल बंगळुरु न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला कर्नाटक उच्च न्यायालयाने आज स्थगिती दिली आहे. कॉग्रेस व व भारत जोडो यात्रेचे ट्विटर हॅण्डल्स ब्लॉक करण्याचा आदेश बंगळुरू न्यायालयाने दिला होता.

आज झालेल्या सुनावणीत कर्नाटक उच्च न्यायालयाने कॉंग्रेसने आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, ट्विटर, फेसबूक, यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरून संबंधित सर्व कॉपीराइटचं उल्लंघन केलेली सामग्री काढून टाकावी, असं म्हटलं आहे. यासाठी उद्यापर्यंत मुदत देण्यात आली आहे.

दरम्यान  एमआरटी म्युझिक कंपनीने काँग्रेसविरोधात कॉपीराइट केस दाखल केली  होती. कॉग्रेसने ट्विटर हॅंडल्सवर KGF-2 चित्रपटातील गाण्यांचे व्हिडिओ शेअर केल्याचा आरोप आहे. असे केल्याने कॉपीराइटचे उल्लंघन झाल्याचा आरोप काँग्रेसवर करण्यात आला आहे. म्युझिक कंपनीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, केजीएफ-2 गाण्याचे हिंदीतील हक्क मिळवण्यासाठी आम्ही खूप पैसे मोजले आहेत.एमआरटी म्युझिकने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काँग्रेस पक्षाने केलेली ही बेकायदेशीर कृत्ये कायद्याचे नियम, व्यक्ती आणि संस्थांच्या अधिकारांची अवहेलना  आहे.

एमआरटी म्युझिकने काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi), जयराम रमेश आणि सुप्रिया श्रीनाते यांच्याविरोधात यशवंतपूर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता.

कोर्टाच्या आजच्या निर्णयामुळे कॉंग्रेस पक्षाला काहीसा दिलासा मिळाला आहे.

8 Nov. 2022

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *