भारतात दिसेल ग्रस्तोदित खग्रास चंद्रग्रहण

 भारतात दिसेल ग्रस्तोदित खग्रास चंद्रग्रहण

मुंबई, दि. ८ ( जितेश सावंत) आज खंडग्रास चंद्रग्रहण आहे.

कार्तिक शु. १५, 8 नोव्हेंबर 2022, मंगळवार

ग्रहण स्पर्श – १४:३९
ग्रहण मध्य – १६:३०
ग्रहण मोक्ष – १८:१९
(वेळा संपूर्ण भारताकरिता आहेत.)

ग्रहण दिसणारे प्रदेश
भारतासह संपूर्ण आशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेच्या पूर्वेकडील प्रदेश व संपूर्ण दक्षिण अमेरिका या प्रदेशात ग्रहण दिसेल.

हे चंद्रग्रहण भारतात सर्वत्र ग्रस्तोदित दिसणार आहे म्हणजे ग्रस्त असलेले चंद्रबिंब उदयास येईल, त्यामुळे भारतात कोठेही ग्रहण स्पर्श दिसणार नाही. भारताच्या पूर्वेकडील काही प्रदेशात खग्रास अवस्था दिसू शकेल, मात्र महाराष्ट्र आणि इतर प्रदेशात सूर्यास्तानंतर थोडावेळ हे ग्रहण खंडग्रास दिसेल.

JS/KA/SL

8 Nov. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *