राज्यातील यंत्रमागधारकांना वीजदरात मिळणार सवलत
मुंबई, दि. २८ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) :अनेक वर्षांच्या मागणी आणि पाठपुराव्यानंतर आता राज्यातील यंत्रमागधारकांना वीजदरांत सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शासन निर्णयानुसार २७ अश्वशक्तीपर्यंत यंत्रमाग असलेल्या यंत्रमागधारकांना ७५ पैसे व २७ अश्वशक्ती खालील छोट्या यंत्रमागधारकांना १ रुपये अतिरिक्त वीज सवलतीचा लाभ मिळणार आहे.ही सवलत एप्रिल २०२४ पासून लागू होणार असल्याची माहिती भाजपचे भिवंडी शहराध्यक्ष अॅड.हर्षल पाटील यांनी दिली.
हर्षल पाटील यांनी सांगितले की,लोकसभा निवडणुकीवेळी भिवंडी पूर्व विधानसभा भाजप निवडणूक प्रमुख संतोष शेट्टी यांच्या पुढाकाराने भिवंडीत वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत शहरातील यंत्रमाग व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींची भेट घडवून आणली होती. त्यावेळी यंत्रमागधारकांनी आपल्या समस्यांचा पाढा वाचला.यावेळी त्यांनी वीज दर सवलत व अनेक मागण्या केल्या होत्या. त्यावर शासनाने निर्णय जाहीर केला असून यामध्ये २७ अश्वशक्तीपर्यंत यंत्रमाग असलेल्या व्यावसायिकांना वीज दरात एक रुपया, तर त्यापेक्षा अधिक अश्वशक्ती असलेल्या यंत्रमाग कारखान्यांना ७५ पैशांची सवलत जाहीर केली आहे ही सवलत एप्रिल २०२४ पासून लागू केल्याने यंत्रमागधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
SL/ML/SL
28 Sep 2024