महिलांना अधिकाधिक संधी देणारं धोरण लवकरच

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सर्व समूह घटकातील महिलांच्या प्रश्नांचा एकत्रित विचार करून महिलांना अधिकाधिक संधी देणारं राज्याचं चौथं महिला धोरण आणलं जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितलं.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज उपसभापती नीलम गोर्हे यांनी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि महिलांना सर्व क्षेत्रात समान तसंच त्यांना सन्मानाचं स्थान मिळावं या अनुषंगाने प्रस्ताव मांडला, या प्रस्तावावरील चर्चेला फडणवीस उत्तर देत होते.
अंतिम टप्प्यात असलेल्या या महिला धोरणात शिक्षणासह रोजगाराला महत्व देत आर्थिक सक्षमीकरण , लैंगिक समानता या घटकांचा प्रामुख्यानं विचार केला जाईल असं त्यांनी सांगितलं.
सर्व क्षेत्रातील महिलांचा सहभाग आणि नेतृत्व वाढलं तसंच महिला शक्ती मनुष्यबळात मोठ्या प्रमाणात परावर्तित झाली तर ट्रीलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था गाठायला आपल्याला वेळ लागणार नाही, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
इंटरनेटच्या या युगात महिलांच्या गोपनीयतेचे आणि सुरक्षेचे प्रश्न समीर आले आहेत ते सोडवण्यासाठी संस्थात्मक रचना या उभारली जाईल असं त्यांनी सांगितलं.
अनाथालयातून बाहेर पडणाऱ्या १८वर्षांवरील मुलींच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकार ठोस योजना राबवणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी केली. त्याचप्रमाणे प्रमुख शहरांमध्ये वर्किंग वुमेन्स हॉटेल्सची संख्या वाढवली जाईल तसंच महामार्गांसह इतर रस्त्यांवर महिलांसाठी अत्याधुनिक स्वच्छ शौचालये बांधण्याचा उपक्रम हाती घेतल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक महिला धोरण तयार करण्याबाबत सरकारने कोणत्या प्रकारच्या उपयोजना करण्याची गरज आहे यासंदर्भात नीलम गोर्हे यांनी आपले विचार मांडले.तर मनीषा कायंदे, उमा खापरे ,प्रज्ञा सातव या महिला सदस्यांसह अन्य काही सदस्यांनी या चर्चेत सहभागी होते आपल्या सूचना मांडल्या.Policy to give more opportunities to women soon
ML/KA/PGB
8 Mar. 2023