पीएम-ई बस – १०० शहरांतून धावणार १० हजारांहून अधिक इलेक्ट्रिक बस
नवी दिल्ली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पुढील काळात 100 शहरांमध्ये 10,000 हून अधिक इलेक्ट्रिक बसेस धावतील. यासाठी केंद्र सरकार निधी देणार आहे. या योजनेला पीएम-ई बस असे नाव देण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बस सेवेलाही मान्यता देण्यात आली आहे. या योजनेवर 57,613 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. याअंतर्गत देशभरात सुमारे 10,000 नवीन इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) मॉडेलवर बसेस चालवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली. 57,613 कोटींपैकी 20,000 कोटी रुपये केंद्र सरकार देणार आहेत. या योजनेत 3 लाख आणि त्याहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांचा समावेश असेल.ई-बस सेवेसाठी केंद्र सरकार 20,000 कोटी रुपये देणार आहे, तर उर्वरित रक्कम राज्य सरकार देणार आहे. ही बस पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमधून चालवली जाणार आहे. बससेवेसाठी सात हजार कोटी रुपयांचे कर्जही घेतले जाणार असल्याचं अनुराग ठाकूर यांनी सांगितलं.
SL/KA/SL
16 Aug 2023