पवारांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल

 पवारांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ट्विटरवरुन आलेल्या धमकीची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याबदल आम्हा सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल. आवश्यकता असल्यास सुरक्षा व्यवस्थेत वाढही करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी टि्वद्वारे सांगितले आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातले वातावरण बिघडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न काही लोकांकडून सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यापासून काही लोक बिथरले आहेत, त्यातून महाराष्ट्रातले वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा आरोपही मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या टि्वटमध्ये केला आहे. औरंगजेब, टिपू सुलतानाचे उदात्तीकरण करुन धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. आपल्या राजकारणासाठी महाराष्ट्रातली कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे कारस्थान हाणून पाडले जाईल, असा निर्धारही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

ML/KA/SL

9 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *