पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सजले तिरंगी रंगात ….

सोलापूर, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): त्याग ,समर्पण, देशभक्ती आणि अध्यात्म शिकवणाऱ्या वारकरी संप्रदायाचे माहेरघर असलेले पंढरपूरचे विठ्ठल मंदिर आज तिरंगी रंगीत सजले आहे. अमृत महोत्सव स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला फुलांपासून तिरंगी रंगाची सजावट करण्यात आली होती. यासाठी सुमारे पाच टन फुलांचा वापर करण्यात आला.
केशरी, पांढरी फुले हिरवी पालन यामध्ये झेंडू ,अस्टर ,शेवंती, गुलाब, मोगरा अशा फुलांचा वापर करून आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे. तर सावळ्या विठुरायासाठी रुक्मिणी मातेचे देखील तिरंगी रंगाचा शेला आज स्वतंत्रता दिनात पांघरण्यात आला होता. त्यामुळे तिरंगी रंगात देखील सावळ्या विठ्ठलाचे अधिक लोभस दिसून येते होते.
ML/KA/PGB
15 Aug 2023