लाल चौकात दिमाखात फडकला तिरंगा
श्रीनगर, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): एके काळी दहशतवाद्यांचे नंदनवन म्हणून कुप्रसिध्द झालेल्या काश्मीर व्हॅली च्या श्रीनगर मधील लाल चौकात आज सकाळीच स्थानिक नागरिकांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने तिरंगा ध्वज दिमाखात फडकला. The tricolor was hoisted brightly at Lal Chowk
काश्मीर खोऱ्यात केवळ दगडफेक, जाळपोळ आणि बंदुकांच्या फैरींचे सत्र सुरू असल्याचे चित्र एकेकाळी पाहायला मिळत होते . लाल चौकात तर दहशतीचे सावट कायम असायचे , तिथे जायला पर्यटकांना बंदी होती. कायम लष्करी आणि निमलष्करी दलाच्या वेढ्यात असणाऱ्या या लाल चौकात आज स्थानिक काश्मिरी नागरिकांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने तिरंगा ध्वज दिमाखात फडकवल्याचे दृश्य सकाळीच दिसून आले. सकाळी सहा वाजल्यापासून या चौकात तिरंगा ध्वज हातात घेऊन नागरिकांनी भारत माता की जय च्या घोषणा दिल्या.
ML/KA/PGB
15 Aug 2023