९ जूनला नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधान पदाची शपथ

 ९ जूनला नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधान पदाची शपथ

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाची शपथ घेण्यासाठी औपचारिक आमंत्रण दिले. रविवारी ९ जूनला संध्याकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. हा सोहळा दरबार हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. आज एनडीएच्या संसदीय दलाची बैठक संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये झाली. यावेळी जे राजनाथ सिंह यांनी मांडलेल्या मोदींच्या नावाच्या प्रस्तावाला अमित शाह, नितीन गडकरी, एचडी कुमारस्वामी, चंद्राबाबू नायडू यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर संसदीय पक्षाच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड झाली 

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले. इंडिया आघाडीही थोड्याफार फरकाने मागे होती. त्यामुळे इंडिया आघाडीकडूनही सत्ता स्थापनेचा दावा केला जात होता. तत्पूर्वी एनडीए नेत्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर राष्ट्रपतींनी नरेंद्र मोदींना आमंत्रण देऊन त्यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींची नियुक्ती केली असून ९ जून रोजी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी त्यांना निमंत्रण दिलं.

पंतप्रधान पदासाठी तिसऱ्यांदा नियुक्ती झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माध्यमांशी संवाद साधाल. ते म्हणाले, “एनडीएची बैठक झाली होती. एनडीएच्या सर्व मित्रांनी मला पुन्हा एकदा या दायित्वासाठी पसंती दिली आहे. एनडीएच्या घटकपक्षांनी याबाबत राष्ट्रपतींना माहिती दिली. त्यानुसार, राष्ट्रपतींनी मला आता बोलावलं होतं. मला पंतप्रधान पदाच्या रुपाने नियुक्ती दिली आहे. मला शपथविधीसाठी आणि मंत्रिपदाच्या यादीसाठी त्यांनी सूचित केलं आहे.”

2024 च्या लोकसभा निकालांनुसार, एनडीए आघाडी 294 जागांवर विजय मिळाला असून, त्यापैकी एकट्या भाजप 240 जागांवर विजय मिळवला आहे. तर इंडिया आघाडीला 232 जागांवर आघाडीवर आहे. यामध्ये एकट्या काँग्रेसनं 99 जागांवर विजय मिळवला आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपचं सर्वाधिक नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं आहे. 2019 च्या तुलनेत येथे भाजपच्या जागांमध्ये मोठी घट पाहायला मिळाली. या राज्यांमध्ये इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट असलेले पक्ष आघाडीवर आहेत.

. On June 9, Narendra Modi will take oath as Prime Minister for the third time in a row

ML/ML/PGB
7 Jun 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *