झोमॅटोवर हजार रुपयांच्या फूड ऑर्डर आता काही पैशात मिळणार; कंपनीकडून नवीन फूड रेस्क्यू फीचर लॉन्च
लोकप्रिय फूड डिलिव्हरी अॅप झोमॅटोने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन फीचर लॉन्च केले आहे, ज्याचे नाव “फूड रेस्क्यू” आहे. या फिचरच्या माध्यमातून ग्राहकांना हजार रुपयांच्या फूड ऑर्डर्स काही कमी किमतीत मिळू शकतील. या फीचर अंतर्गत झोमॅटोवर विविध प्रकारचे पदार्थ, विशेषत: अन्नाच्या अपव्ययास प्रतिबंध करण्यासाठी कमी किंमतीत उपलब्ध असतील. यामुळे ग्राहकांना स्वस्तात चांगल्या दर्जाचे अन्न मिळण्याची संधी मिळेल.
झोमॅटोच्या या नवीन उपक्रमामुळे अन्नाच्या अपव्ययात घट येईल आणि ग्राहकांच्या खिशावरचा भारही कमी होईल.